नवमहाराष्ट्राचे नवनेतृत्व देवेंद्र फडणवीस!

पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद ते मुख्यमंत्री असा यशस्वी टप्पा गाठणारे देवेंद्रजी आता विरोधी पक्षनेते म्हणून विधानभवनात राज्यातील १२ कोटी जनतेचा हक्काचा खणखणीत आवाज म्हणून उभे आहेत.
bjp mla mangesh chavan wishes devendra fadnavis on his birthday
bjp mla mangesh chavan wishes devendra fadnavis on his birthday

सलग ५ वर्ष महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची विक्रमी धुरा सांभाळत अनेक आव्हानांना तोंड देणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते, नवमहाराष्ट्राचे नवनेतृत्व श्री.देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा.

स्वच्छ प्रतिमा, अभ्यासू वृत्ती, कुशल युवा राजकारणी आणि आर्थिक धोरणांसह विविध विषयांचा व्यासंग असलेले देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपली वेगळी छाप सोडली. नगरसेवक, सर्वात कमी वयात महापौर, आमदार, पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद ते मुख्यमंत्री असा यशस्वी टप्पा गाठणारे देवेंद्रजी आता विरोधी पक्षनेते म्हणून  विधानभवनात राज्यातील १२ कोटी जनतेचा हक्काचा खणखणीत आवाज म्हणून उभे आहेत.

राज्यातील अवकाळी पावसामुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी विधानसभेत आवाज उचलून देवेंद्रजी यांनी राज्य शासनास निर्णय घेण्यास भाग पाडले. आपल्या नेतृत्वक्षमतेच्या जोरावर अभूतपूर्व अशा कोरोना संकटाच्या काळात जनतेला धीर देत त्यांच्या समस्यांना वाचा फोडली. एकीकडे राज्याचे जबाबदार मुख्यमंत्री गेली दीड वर्ष घरात क्वारंटाईन असताना दुसरीकडे मात्र जनतेच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता महाराष्ट्र पिंजून काढला. 

असं म्हणतात की कार्यकर्त्यांचे कर्तुत्व हे नेतृवावर आधारित असत, कोरोनामुळे सर्वदूर भीतीचे वातावरण असताना हातावर पोट असणाऱ्या कष्टकरी जनतेची होणारी फरफट व रुग्णांचे होणारे हाल लक्षात घेत देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भाजपातर्फे जनतेच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. स्वतः नेतृत्वच फिल्डवर उतरल्याने आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना देखील प्रोत्साहन मिळाले. 

माझ्या चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर देवेंद्रजींच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात वरखेडे - लोंढे धरणाला दिलेले 'केंद्रीय बळीराजा जलसंजीवनी' योजनेचे  कवच मिळाले, त्यामुळे आज तो प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. चाळीसगाव नगरपालिका निवडणुकीत प्रचारसभेसाठी आले असताना त्यांनी हजारोंच्या जनसमुदायाच्या साक्षीने गेल्या ४५ वर्षांपासून मागणी असलेल्या व कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा उभारणीचा शब्द दिला व दिलेला शब्द पाळत त्यांच्या कार्यकाळात सर्व परवानग्या मिळाल्याने आज चाळीसगाव वासियांचे शिव स्मारकाचे स्वप्न पूर्ण होत आहे. 

देवेंद्रजींच्या कुशल अशा कार्यकाळात १२ कोटींचे शहरात साकारलेले अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालय, २.५ कोटींचे ट्रामा केअर सेंटर, १४८ कोटींची भूयार गटार योजना, ६८ कोटींची विस्तारीत पाणी पुरवठा योजना आदी माध्यमातून एक नव चाळीसगाव घडविण्याच्या दृष्टीकोनातून निर्णायक पाऊले पडली त्याबद्दल समस्त चाळीसगाव वासीयांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. 

राज्यातील सर्वात मोठ्या पक्षाची धुरा सांभाळत असताना तीन पक्षांच्या महाविकास आघाडीला देवेंद्रजी यांनी सळो पळो करून सोडले असल्याचे सर्व राज्याने पाहिले. कुणीतरी उपहासाने म्हटले होते की “अकेला देवेंद्र क्या करेगा” मात्र गेल्या वर्षभरात सत्ताधारी पक्षाची आपल्या आक्रमक व अभ्यासू मुद्द्यांनी घायाळ झालेल्या महाविकास आघाडीला “अकेला देवेंद्र ही काफी है” असच म्हणाव लागेल. सुरुवातीला सत्ता न आल्याने विरोधी पक्षाचा आमदार म्हणून माझी आमदारकीची पहिली कारकीर्द जेव्हा सुरु केली तेव्हा थोड वाईट वाटल होत, मात्र विरोधी पक्ष काय असतो, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी, निरंकुश सत्तेवर अंकुश ठेवण्यासाठी विरोधीपक्षाची भूमिका हे सर्व देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात मला गेल्या दीड वर्षात शिकायला मिळाले, जनतेच्या प्रश्नांशी नाळ ठेवता आली.

राज्याच्या कोट्यावधी जनतेचे आशिर्वाद त्यांच्यासोबत आहेत.  देवेंद्रजींच्या हातून अशी महाराष्ट्राची सेवा घडत राहो व ‘देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ हा संकल्प घेत लवकरच पुन्हा एकदा राज्याचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळो अश्या शुभेच्छा यानिमित्ताने देतो. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com