भाजपचे आमदार मंगेश चव्हाण कोरोना पॉझिटिव्ह 

आमदार चव्हाण यांना आजाराची लक्षणे दिसली त्यांनी आपली कोरोना तपासणी करून घेतली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
1mangesh_chavanf.jpg
1mangesh_chavanf.jpg

जळगाव : चाळीसगाव येथील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, त्यांना कोणतीही लक्षणे नसल्याने ते घरीच सेल्फ क्वारंटाइन झाले आहेत. याबाबत त्यांनीच सोशल मिडीयावर ही माहिती दिली आहे.

चाळीसगाव येथील भारतीय जनता पक्षाचे मंगेश चव्हाण युवा आमदार आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत ते चाळीसगाव मतदार संघातून विजयी झाले आहेत. मतदार संघात सामाजिक कार्य करण्यात त्यांचा मोठा धडका आहे. कोरोना काळातही त्यांनी मतदार संघात कार्य सुरूच ठेवले आहेत.

परंप्रातीय मंजुरांना जेवण देणे, त्यांना स्वत:च्या वाहनातून त्यांना सीमेपर्यंत पोहोचविले. तसेच त्यांनी मजुरांच्या जेवणाची सुविधाही मोठ्या प्रमाणात केली होती. तसेच चाळीसगाव येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरला त्यांनी वेळोवेळी भेटी दिल्या आहेत. त्या ठिकाणी रूग्णांच्या सुविधाकडेही त्यांनी लक्ष दिले आहे. त्यांचा उद्या (ता.२३) वाढदिवस असल्याने कार्यकर्त्यातर्फे त्याची तयारीही करण्यात येत होती.

आमदार चव्हाण यांना आजाराची लक्षणे दिसली त्यांनी आपली कोरोना तपासणी करून घेतली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांचया सल्ल्यानुसार ते आपल्या घरीच क्वारंटाइन झाले आहेत. त्यांनी सोशल मिडीयावर म्हटले आहे, कि कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसत असल्याने मी चाचणी केली असता. माझा कोविडचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

माझी तब्बेत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी स्वत;ला सेल्फ क्वारटाइन करून घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत;ची चाचणी करावी व आपल्या सर्वांची काळजी घ्यावी हि विनंती ! आपल्या सर्वांच्या शुभेच्छा माझ्या सोबत आहेत. काळजीचे कारण नाही. आमदार मंगेश चव्हाण यांचा उद्या (ता. २३) रोजी वाढदिवस आहे.

हेही वाचा : सकाळी पॅाझिटिव्ह... सांयकाळी निगेटिव्ह...  

मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी राज्यभर  'चेस द व्हायरस' ही मोहीम सुरू आहे. पण काही ठिकाणी कोरोना तपासणी अहवालातच गैरप्रकार होत असल्याने रूग्ण मात्र हवालदिल झाले आहेत. मुंबईसह राज्यात काही ठिकाणी असे प्रकार झाल्याचे उघड झाले आहे. महापालिका प्रशासनाने जनतेची काळजी घेण्याऐवजी त्यांचा कोरोना अहवाल चुकीचा देऊन नागरिकांना मनस्ताप होत आहे, याला जबाबदार असलेल्या संबधितांना मनसे स्टाईलने उत्तर दिलं जाईल, असा इशारा मनसे दिला आहे. सकाळी कोरोना अहवाल पॅाझिटिव्ह येतो, संध्याकाळी अहवाल निगेटिव्ह असल्याचं सांगितलं जाते. दहिसरमध्ये 900 बेडचं सेंटर उभारलं आहे. ते भरण्यासाठी हे केलं जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com