नाशिकच्या महापौरांवर भाजपच्या नेत्यांचा विश्वास नाय का!

भाजपचे आमदार तर कधी पक्षाचे पदाधिकारीच सतत महापालिका प्रशासनाविरोधात आवाज उठवतात. त्यामुळे भाजप नेत्यांना आपल्याच महापौरांच्या कार्यक्षमतेवर विश्वास नाय का?
BJP Mayor, Devyani Pharande & Hemant Gaikwad
BJP Mayor, Devyani Pharande & Hemant GaikwadSarkarnama

नाशिक : महापालिकेत (Nashik municiple corporation) बहुमत आणि सत्ता भारतीय जनता पक्षाची. (BJP) सर्व पदे या पक्षाकडे (BJP is rulling party) अन् मुख्य म्हणजे महापौर (Mayor) देखील त्यांचाच. थोडक्यात महापालिकेच्या कारभाराची सर्व सूत्रे महापौर सतीश कुलकर्णी (Satish Kulkarni) यांच्याकडे आहे. मात्र कधी भाजपचे आमदार (MLA) तर कधी पक्षाचे पदाधिकारीच सतत महापालिका प्रशासनाविरोधात आवाज उठवतात. त्यामुळे या नेत्यांना आपल्या पक्षाच्याच महापौरांवर विश्वास नाय का? असा प्रश्न पडू लागला आहे.

शहरातील आमदार देवयानी फरांदे यांनी नुकतेच महापालिकेच्या रस्त्यांच्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. तर पक्षाचे नाशिक रोड विभागीय अध्यक्ष हेमंत गायकवाड यांनी प्रशासन चुका करते व लोक भाजपवर टिका करतात, असा आरोप केला आहे. यापूर्वीही या पक्षाच्या नेत्यांनी महापालिकेच्या कारभारावर टिका केली आहे. त्यामुळे शहरात तीन आमदार, महापालिकेत संपुर्ण बहुमत व सर्व पदे तसेच मुख्य म्हणजे महापौर त्यांच्याच पक्षाचा आहे. महापौरांकडे कारभाराची सर्व सूत्रे असतात. मग या नेत्यांना आपल्याच महापौरांच्या कार्यक्षमतेवर विश्वास राहिला नाही की काय? प्रशासनावर दबाव टाकण्यात वेगळा काही हेतू आहे, असा प्रश्न पडतो. भाजपला आपल्याच महापौरांवर विश्वास नाय का?

BJP Mayor, Devyani Pharande & Hemant Gaikwad
छगन भुजबळ संतप्त... महामार्ग दुरुस्त करता की कारवाई करू!

केवळ ठेकेदाराचा आर्थिक फायदा

शहरात सध्या रस्ते खड्डे भरण्याचे काम सुरू असून, होत असलेली कामे अंत्यत निकृष्ट दर्जाचे होत आहे. या कामांची चौकशी करावी, अशी मागणी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे केली आहे. शहरात पावसामुळे रस्त्यांना अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, ते खड्डे भरण्याचे काम महापालिकेच्या ठेकेदारामार्फत केले जात आहे. ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. रस्त्यावरील खड्डे भरल्यानंतर दोनच दिवसात पुन्हा खड्डे तयार होत असून, मुरूम रस्त्यावर पसरून मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे. महापालिकेचे अधिकारी व ठेकेदारांचे संगनमताने कामे निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप आमदार फरांदे यांनी केला. महापालिकेचा उद्देश केवळ ठेकेदाराचा आर्थिक फायदा करून देणे असल्याचे मत व्यक्त केले.

BJP Mayor, Devyani Pharande & Hemant Gaikwad
खासदार हेमंत गोडसे म्हणाले, `रस्ता दुरूस्ती होईपर्यंत टोल बंद करा!`

प्रशासन नाकर्ते : हेमंत गायकवाड

महापालिकेत सत्ताधारी भाजपच्या माध्यमातून साडेचार वर्षात विकासाची अनेक विविध कामे झाली. त्यातील काही सुरू आहे, तर काही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. शहर विकासाच्या नव्या वळणावर पोचत असताना प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे बदनामीला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप भाजप नाशिक रोड मंडल अध्यक्ष हेमंत गायकवाड यांनी करताना कामकाजात सुधारणा करा अन्यथा मोठ्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला. खरे तर हेमंत गायकवाड यांना आंदोलन करायचे म्हणजे नेमके कशासाठी?. कोणाच्या विरोधात? एखादी यंत्रणा अयशस्वी झाली, तर आंदोलन करण्याचा प्रघात आहे. त्यामुळे ही भाजप सत्तेत असताना जर त्यांना स्वतःच्या विरोधातच आंदोलन करावे लागत असेल, नागरिकांनी त्यातून काय संदेश घ्यायचा?

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा आलेख मांडताना श्री. गायकवाड यांनी एकप्रकारे आपला पक्ष अयशस्वी झाला, असे ते अजाणतेपणे मान्य केल्यासारखेच आहे. त्यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावर बोट ठेवले. ते म्हणाले, पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीसाठी निधीची तरतूद केली जाते. सहा विभागात प्रत्येकी सहा कोटी याप्रमाणे ही तरतूद असते. या निधीतून पावसामुळे होणारे खड्डे बुजविणे, खडीकरण, मुरूम टाकणे, ग्रिड टाकणे, बीबीएम व यंत्र वापराचा खर्च समाविष्ट असतो. परंतु, ती कामे वेळेत होत नाही. वेळकाढूपणामुळे खड्ड्यांतून प्रवास करावा लागतो. यात अपघात होतात, तर अनेकांना जीव गमवावा लागतो. निधीची तरतूद करूनही रस्ते दुरुस्ती होत नसल्याने यातून प्रशासनाची सत्ताधारी भाजपला बदनाम करण्याची कार्यपद्धती नाही ना, असा संशय येतो. कामकाज होत नसले तर रस्ते दुरुस्तीचा निधी गेला कुठे, असा सवाल श्री. गायकवाड यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून घरोघरी गॅस पुरविण्यासाठी पाइपलाइन टाकली जात आहे. त्यासाठी रस्ते खोदण्यात आले. रस्ते खोदण्यापूर्वी बांधकाम विभागाकडे तोडफोड फी पोटी ७९ कोटी रुपये जमा करण्यात आले असताना त्या निधीतून कामे का केली जात नाही, जलवितरण व्यवस्था सुधारण्यासाठी जलकुंभ उभारण्याबरोबरच शहरात पाइपलाइन टाकण्याची कामे सुरू आहेत. त्यासाठीदेखील निधीची तरतूद करण्यात आली आहे. परंतु, रस्ते दुरुस्त का केले जात नाही, असा सवाल श्री. गायकवाड यांनी उपस्थित केला.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com