पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गिरीश महाजन थेट उतरले कोकणात

भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन हे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी थेट कोकणात दाखल झाले आहेत.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गिरीश महाजन थेट उतरले कोकणात
bjp leader girish mahajan reach konkan to help flood victims

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते व माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे पूरग्रस्तांच्या (Floods) मदतीसाठी थेट कोकणात महाड (Mahad) येथे दाखल झाले आहेत. यापूर्वी सांगली, कोल्हापूर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ते तत्परतेने पोचले होते. भाजप परिवार म्हणून आम्ही बचावकार्य व सर्वोतोपरी मदतीसाठी प्रयत्न करीत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. 

आमदार गिरीश महाजन यांना भाजपचे संकटमोचक म्हटले जाते. दोन वर्षांपूर्वी सांगली, कोल्हापूर येथे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ते तातडीने पोचले होते. त्यावेळी ते पुराच्या पाण्यात अडकले होते मात्र, त्याही स्थितीत त्यांनी मदत केली होती. आता कोकणात महाड येथे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या समवेत पोचले आहेत. 

गिरीश महाजन यांनी ट्विटरवरून महाडमधील पूर परिस्थितीची माहिती दिली आहे.त्यांनी फोटोही ट्विट केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या समवेत मी पूर ओसरल्यानंतर महाडची पाहणी केली. या ठिकाणची बाजारपेठ, बसस्थानक परिसराची परिस्थिती खूपच विदारक आहे. खासगी, शासकीय मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या अकल्पनीय भीषण संकटातून सावरून उभे राहण्याचे मोठे आव्हान स्थानिक नागरिकांसमोर आहे. भाजप परिवार म्हणून आम्ही बचावकार्य व सर्वोतोपरी मदतीसाठी प्रयत्न करीत आहोत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in