nashik zp preseident kshirsagar runs administration without ceo | Sarkarnama

अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागरांकडून `सीईओ'विना नाशिक "जिप'चा कारभार सुसाट

संपत देवगिरे
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर सुमारे महिनाभर या जिल्हा परिषदेला "सीईओ' नाही. नियोजन मंडळाच्या बैठकीत जिल्हा परिषदेचा अवघा वीस टक्के खर्च झाल्याचे विदारक सत्य पुढे आले. त्यानंतर अध्यक्ष क्षीरसागर यांनी "सीईओ' आणि अध्यक्ष या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत निधी खर्चाचे प्रमाण 65 टक्‍क्‍यांवर नेले. कामकाजाला गती देत थेट भेटी व बैठकांचा धडाका लावला. त्यामुळे प्रशासनाची गाडी सुसाट निघाली आहे.

नाशिक ः शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर सुमारे महिनाभर या जिल्हा परिषदेला "सीईओ' नाही. नियोजन मंडळाच्या बैठकीत जिल्हा परिषदेचा अवघा वीस टक्के खर्च झाल्याचे विदारक सत्य पुढे आले. त्यानंतर अध्यक्ष क्षीरसागर यांनी "सीईओ' आणि अध्यक्ष या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत निधी खर्चाचे प्रमाण 65 टक्‍क्‍यांवर नेले. कामकाजाला गती देत थेट भेटी व बैठकांचा धडाका लावला. त्यामुळे प्रशासनाची गाडी सुसाट निघाली आहे.

नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांची महिन्यापूर्वी बदली झाली. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. या दरम्यान पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नियोजन मंडळाची बैठक घेतली. तेव्हा 719 पैकी 156 म्हणजेच फक्त वीस टक्के निधी खर्च झाला होता. त्यामुळे अखर्चित निधी परत जाण्याची स्थिती होती. त्यावरुन संतप्त मंत्र्यांनी तीन अधिकाऱ्यांवर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. हे चित्र पुढे आल्यावर अध्यक्ष क्षीरसागर यांनीच सगळी सुत्रे हाती घेत प्रशासनाला विश्‍वासात घेतले. नियमीत बैठका सुरु झाल्या. त्यानंतर दहा दिवसांत निधी खर्चाचे प्रमाण 40 टक्‍क्‍यांवर गेले. सध्या ते 65 टक्‍क्‍यांवर आहे. येत्या महिनाभरात शंभर टक्के निधी खर्च होईल असे नियोजन त्यांनी केले आहे. 

प्रत्येक चार दिवसांनी ते बैठका घेतात. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अडचणी दुर करतात. विभागांमध्ये समन्वय निर्माण करतात. विविध विभागांना भेटी देतात. त्याचा परिणाम म्हणून ज्या जिल्हा परिषदेचा निधी अखर्चित असल्याने परत जाणार होता. त्या जिल्हा परिषदेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अतिरिक्त निधी मिळाला आहे. नाशिक जिल्ह्याला 75 कोटींचा निधी मिळणार आहे. त्यातील 25 कोटी जिल्हा परिषदेला दिले जातील. यामुळे अधिकाऱ्यांतही क्षीगरासगर चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. सध्या त्यांचे कार्यकर्ते त्यांना गमतीने जिल्हा परिषदेचे "सीईओ' कम अध्यक्ष म्हणतात.

मंगळवारी त्यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभागाना भेटी दिल्या. आतापर्यंत त्यांनी नऊ विभागांना भेटी दिल्या. यावेळी अकार्यक्षम कर्मचाऱ्यांना शिवसेना "स्टाईल' समज दिली. यावेळी 21 कर्मचारी विनापरवानगी गैरहजर आढळले. त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. भाडांर विभागात परिचरांना देण्यात येणारे उलनचे कापड पडून असल्याचे दिसले. हिवाळा संपत आला तरी हे कापड पडून कसे? यावर 600 जणांना दिले आहे. 400 जणांनी मागणी केली नसल्याचे उत्तर आले. तेव्हा कर्मचाऱ्यांच्या मागणीची वाट कशाला पाहता?. त्याआधीच वाटप का केले नाही? अशा शब्दात अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले.

"प्रशासनाची गाडी सुरळती झाल्यावर लवकरच पंचायत समिती स्तरावरही बैठका घेऊन तपासणी व कामकाजाचा आढावा घेणार आहे. जनतेच्या अडचणी व ग्रामीन भागातील विकासाला गतीदेण्यासाठी ते आवश्‍यक आहे. 
- बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष, जिल्हा परिषद.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख