नाशिकच्या जिल्हा परिषदेतील 'महिलाराज' आज संपुष्टात!

जिल्हा परिषदेतील विद्यमान अध्यक्ष-उपाध्यक्षांसह विषय समितीच्या सभापतींची मुदत संपली आहे. आज जिल्हा परिषदेच्या नव्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडणूक होत आहे. त्यासाठी गतवेळी शिवसेना कॉंग्रेस एकत्र होती. यंदा शिवसेना, दोन्ही कॉंग्रेस एकत्र येऊन महाविकास आघाडीचा प्रयोग होच आहे. या पार्श्‍वभूमीवर अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या दालनात निरोपाची औपचारिक बैठक झाली. यावेळी सर्व महिला पदाधिकारी एकत्र आल्या होत्या.
Mahilaraj in Nashik Zilla Parishad Ends Today
Mahilaraj in Nashik Zilla Parishad Ends Today

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेत गेले तीन वर्षे सर्व महत्त्वाची पदे महिलांकडे होते. हे महिलाराज आज होणाऱ्या निवडणुकीने संपुष्टात आले. त्याच्या पूर्वसंध्येला जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे म्हणाल्या, ''मी साधी गृहिणी आहे. मात्र थेट अध्यक्ष झाले. गत तीन वर्षे कामकाज करतांना जिल्हा परिषदेत मला अनेकांकडून खुप शिकायला मिळाले. त्यामुळे आता थोडा अनुभव गाठीशी आला आहे.''

जिल्हा परिषदेतील विद्यमान अध्यक्ष-उपाध्यक्षांसह विषय समितीच्या सभापतींची मुदत संपली आहे. आज जिल्हा परिषदेच्या नव्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडणूक होत आहे. त्यासाठी गतवेळी शिवसेना कॉंग्रेस एकत्र होती. यंदा शिवसेना, दोन्ही कॉंग्रेस एकत्र येऊन महाविकास आघाडीचा प्रयोग होच आहे. या पार्श्‍वभूमीवर अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या दालनात निरोपाची औपचारिक बैठक झाली. यावेळी सर्व महिला पदाधिकारी एकत्र आल्या होत्या. 

यावेळी त्या म्हणाल्या, ''आमचा आपापसांत उत्तम समन्वय होता. भिन्न पक्ष असुनही वादावादीचे प्रसंगही खूप कमी आले. आम्ही नेहेमीच एकमेकांची सोय पाहिली. अगदी बैठकांनाही बोरबरच गेलो. त्यातून वादाशिवाय चांगली कामे झाली. जिल्हा परिषदेच्या शाळांना संरक्षक भिंत बांधण्याची तरतूद नव्हती; परंतु, हे काम केल्याचे मोठे समाधान मिळाले. गेल्या तीन वर्षांत जिल्हा परिषदेच्या सदस्यांसह विषय समितीच्या विविध पदाधिकाऱ्यांकडून तसेच अधिकारी वर्गाकडून चांगले सहकार्य मिळाले.'' केवळ शिवसेनेचेच नव्हे तर सर्वच पक्षांच्या सदस्यांकडून चांगले सहकार्य मिळाल्याचे श्रीमती सांगळे यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सांगळे, उपाध्यक्षा नयना गावीत, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्‍वरी, सभपाती अपर्णा खोसकर, मनीषा पवार व सुनीता चारोस्कर या सगळ्या महिलाच होत्या. त्यामुळे तीन वर्षे शंभर टक्के महिलाराज अनुभवण्यास मिळाले. ते आज संपुष्टात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com