चांद्रयान २ मोहिमेत नाशिकच्या मनीष भामरेंच्या कष्टाचे झाले फलीत; इस्त्रोकडून गौरव - Nashik Youth's Contribution in Chandrayan II Mission | Politics Marathi News - Sarkarnama

चांद्रयान २ मोहिमेत नाशिकच्या मनीष भामरेंच्या कष्टाचे झाले फलीत; इस्त्रोकडून गौरव

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 29 जुलै 2019

चांद्रयान २ मोहिमेतील अवकाश मानाचे बाहेरचे कवच मुंबईच्या 'एल अँड टी' कंपनीच्या खास पथकाने तयार केले आहे. त्यासाठी पाच अभियंत्यांच्या चमुने तांत्रिक व अन्य कामांचे नियोजन, पर्यवेक्षण आणि अंमलबजावणी केली. यामध्ये मनिष भामरे एक प्रमुख सदस्य होते. त्यांच्या चमूकडून हे काम यशस्वीरित्या आणि अपेक्षित वेळेआधी पूर्ण झाले.

नाशिक : चांद्रयान २ मोहिमेद्वारे भारतीय शास्त्रज्ञ आणि देशाचा जगभर गौरव होत आहे. यातून भारताचा अवकाश संशोधनातील आपला दबदबा वाढला. यामध्ये नाशिकच्या सोमपूर या छोट्याशा गावातील आणि शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या मनिष भामरे या अभियंत्याचेही योगदान आहे. त्यासाठी इस्त्रोकडून त्यांना पत्र देऊन गौरविण्यात आले आहे. त्यामुळे या गावात आनंदोत्सव साजरा झाला.

चांद्रयान २ मोहिमेतील अवकाश मानाचे बाहेरचे कवच मुंबईच्या 'एल अँड टी' कंपनीच्या खास पथकाने तयार केले आहे. त्यासाठी पाच अभियंत्यांच्या चमुने तांत्रिक व अन्य कामांचे नियोजन, पर्यवेक्षण आणि अंमलबजावणी केली. यामध्ये मनिष भामरे एक प्रमुख सदस्य होते. त्यांच्या चमूकडून हे काम यशस्वीरित्या आणि अपेक्षित वेळेआधी पूर्ण झाले. यासाठी इस्त्रोकडून त्यांचा खास पत्राद्वारे गौरव करण्यात आला आहे. या पत्रात त्यांच्या चमूचे अभिनंदन केले आहे.  

स्वतः मनिष भामरे हे सोमपूर  (ता. बागलाण) येथील शेतकरी कुटुंबाशी संबंधित आहेत. त्यांचे आई शोभा व वडील डाॅ नाना भामरे सध्या पुणे येथे वास्तव्यास आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख