राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा निर्धार - डान्सबारची छम छम नाशिकमध्ये होऊ देणार नाही! 

''मुंबई महानगरात डान्सबार सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र नाशिकमघध्ये डान्सबारची छम छम सुरु होऊ देणार नाही. समाज, युवकांची हानी करणारे हे प्रकार सुरु केल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल. त्यामुळे नाशिकमध्ये डान्सबारला परवानगी देऊ नये," अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी शिष्टमंडळासह निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन केली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा निर्धार - डान्सबारची छम छम नाशिकमध्ये होऊ देणार नाही! 

नाशिक : ''मुंबई महानगरात डान्सबार सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र नाशिकमघध्ये डान्सबारची छम छम सुरु होऊ देणार नाही. समाज, युवकांची हानी करणारे हे प्रकार सुरु केल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल. त्यामुळे नाशिकमध्ये डान्सबारला परवानगी देऊ नये," अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी शिष्टमंडळासह निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन केली. 

'काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात तेरा वर्षांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री (स्व.) आर. आर. पाटील यांनी डान्सबारवर बंदी आणली. डान्सबारमुळे तरुण पिढीचे भविष्य धोक्‍यात आले होते. डान्सबारमध्ये पैसा उधळण्यासाठी तरुण गुन्हेगारीच्या आणि अवैध धंद्याच्या आहारी गेले होते. अनेकांची कुटुंबे उद्‌ध्वस्त झाली. बारमधून रात्री पार्टी करून परतणारे अनेक जण महामार्गावर मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या. अशा अनेक बाबींचा विचार करून राज्यात डान्सबारवर बंदी घालण्याचा कायदा केला. मात्र, भाजप-शिवसेना युती सरकारने सर्वोच्च न्यायालयात डान्सबारवरील विरोध प्रखरपणे न मांडल्याने सरकारची बाजू कमकुवत राहिली आणि राज्यात पुन्हा एकदा डान्सबार सुरू करण्याची परवानगी मिळाली,' असे खैरे यांनी निवेदनात म्हटले आहे. 

कायदा व सुव्यवस्था राहावी यासाठी डान्सबारला परवानगी देऊ नये, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शिष्टमंडळात अॅड. चिन्मय गाढे, नीलेश सानप, डॉ. संदीप चव्हाण, संतोष भुजबळ, सागर बेदरकर, सुनील घुगे, भूषण गायकवाड, नदीम शेख, मितेश राठोड, जयभाऊ कोतवाल, रोहित जाधव, राज रंधावा, संतोष पुंड, बजरंग गोडसे आदींचा समावेश होता. लवकरच याविषयी जनजागृती मोहीम हाती घेऊ असे खैरे यांनी यावेळी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com