युवा नेत्यांच्या मिसळ पार्टीतुन भुजबळ, कोकाटेंच्या मनोमिलनाला शह ? 

लोकसभा निवडणुकीचे मतदान झाले. त्यामुळे शहराच्या हितासाठी पुन्हा एकत्रीतपणे काम करण्याचा संदेश देण्यासाठी मिसळ पार्टी झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे समीर भुजबळ, अपक्ष माणिकराव कोकाटे यांसह सर्व प्रमुख पक्षांचे नेते त्यासाठी एकत्र आले. मात्र, विविध युवा नेत्यांना हे मनोमिलन रुचले नसावे. या मिसळ पार्टीला उत्तर देण्यासाठी सर्वच पक्षांच्या युवा नेत्यांनी एकत्र येत 'हम भी कुछ कम नही' हे दाखवत दुसरी मिसळ पार्टी केली.
युवा नेत्यांच्या मिसळ पार्टीतुन भुजबळ, कोकाटेंच्या मनोमिलनाला शह ? 

नाशिक : लोकसभा निवडणुकीचे मतदान झाले. त्यामुळे शहराच्या हितासाठी पुन्हा एकत्रीतपणे काम करण्याचा संदेश देण्यासाठी मिसळ पार्टी झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे समीर भुजबळ, अपक्ष माणिकराव कोकाटे यांसह सर्व प्रमुख पक्षांचे नेते त्यासाठी एकत्र आले. मात्र, विविध युवा नेत्यांना हे मनोमिलन रुचले नसावे. या मिसळ पार्टीला उत्तर देण्यासाठी सर्वच पक्षांच्या युवा नेत्यांनी एकत्र येत 'हम भी कुछ कम नही' हे दाखवत दुसरी मिसळ पार्टी केली. एव्हढेच नव्हे तर त्यात सर्व पक्षाच्या युवकांची समिती स्थापन केल्याने हा एक प्रकारे नेत्यांना शह दिल्याची चर्चा आहे. 

लोकसभा निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांच्या धुराळ्यानंतर गुरुवारी सर्वपक्षीय नेते, पत्रकारांसाठी मिसळ पार्टी झाली होती. त्यापाठोपाठ शुक्रवारी नेत्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे कार्यकर्ते, युवा आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत स्वतंत्र मिसळ पार्टी केली. वैचारिक मतभेद असले तरी सर्वपक्षीय तरुणाई एकत्र असल्याचा संदेश देताना आपसांतील मतभेद मिटविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. मात्र, पक्षीय विचारधारा हे राजकारणातील प्रमुख वैशिष्ठ्ये असते. तीच विसरुन नेते एकत्र येऊ लागले तर निवडणुकांत प्रचारासाठी चुरशीने लढणारे पाठीराखे आणायचे कुठुन? राजकीय पक्षांत वेगळेपण तरी सांगणायचे कसे? ही नवी चर्चा रंगली झाली. त्याचे निम्मत ठरले मिसळ पार्टीतुन स्थापन झालेली सर्व पक्षीय युवा समिती. 

गंगापूर रोडवरील हॉटेल करी लिव्हज्‌ येथे झालेल्या या मिसळ पार्टीत सहभागी कार्यकर्त्यांनी निवडणूक काळातील आठवणींना उजाळा दिला. निवडणूक काळात वैचारिक मतभेद असले, तरी शहर-जिल्ह्याच्या विकासासाठी युवानेतृत्वाने एकत्रित राहण्याची गरज आहे, असा विचार या वेळी व्यक्त करण्यात आला.

मिसळ पार्टीला जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा नयना गावित (कॉंग्रेस), जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार (राष्ट्रवादी कॉंग्रेस), सीमंतिनी कोकाटे, रश्‍मी हिरे- बेंडाळे (भाजप), राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष नंदन भास्करे, चिन्मय गाडे, भारतीय जनता युवा मोर्चाचे सचिन हांडगे, हृषीकेश आहेर, मनसेचे कौशल पाटील, युवासेनेचे प्रचारक व अधिसभा सदस्य अमित पाटील, युवासेना महानगरप्रमुख आदित्य बोरस्ते, अजिंक्‍य चुंबळे, बाळा दराडे, कॉंग्रेसचे किरण जाधव, स्वप्नील पाटील आदेंसह विविध कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष श्‍याम गोहाड यांनी संयोजन केले. निवडणुकीनंतर नातेसंबंध सुधारविण्यासाठी झालेल्या या मिसळ पार्टीत विविध विषयांवर चर्चा झाली. या वेळी शहरांच्या युवा क्षेत्रासंदर्भात तसेच शहर विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचा निर्णय झाला. त्यातून या वेळी सर्वपक्षीय युवा समिती स्थापन करण्यात आली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com