नाशिकच्या खऱ्या मर्दानींनी पाहिला `मर्दानी-2`

...
nashik women police watched mardani-2
nashik women police watched mardani-2

पुणे : उन्नावपासून हैदराबादपर्यंत महिला अत्याचारांच्या घटनांनी देश हादरून गेला असताना या विषयावरील अभिनेत्री राणी मुखर्जीचा ‘मर्दानी-२’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. लैंगिक अत्याचार करणाऱ्या विरोधात कारवाई करणाऱ्या शिवानी या महिला पोलिस अधिकाऱ्याची भूमिका राणीने साकारली आहे. या चित्रपटातील `शिवानी`ने पोलिस अधिकारी म्हणून बजावलेली कामगिरी  नाशिक पोलिस दलातील खऱ्याखुऱ्या मर्दानींनी अनुभवली.

नाशिक जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक शर्मिष्टा घारगे-वालावलकर यांनी नाशिक शहर आणि जिल्ह्यातील तब्बल 300 महिला पोलिसांना एकत्र हा चित्रपट पाहण्याचा योग जुळवून आणला. नाशिकचे आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि नाशिकच्या अधीक्षक आरती सिंग यांनीही या उपक्रमाला पाठबळ दिले. आरती सिंग यांच्यासह  उपायुक्त पौर्णिमा चौगुले या शोसाठी उपस्थित होत्या.

राजस्थानमधल्या कोटा शहरात सनी (विशाल जेठवा) हा एक विकृत तरुण आहे हे तो स्वतःच पहिल्याच प्रसंगात सांगतो. लैंगिक अत्याचार करणारा आणि खून करणारा हा क्रूर तरुण. तो एका तरुणीवर अत्याचार करून तिला बीभत्स पद्धतीनं मारतो आणि त्यानंतर एसीपी शिवानी रॉयकडे (राणी मुखर्जी) हे प्रकरण येतं. त्यातून होत जाणाऱ्या एकेक घडामोडी आणि शिवानी या सनीपर्यंत पोचते की नाही हे थ्रिलर पद्धतीनं हा चित्रपट दाखवतो.

महिलांना पोलिस विभागात काम करताना अनेक अडचणी येत असतात. `मर्दानी`मध्ये देखील यावर प्रभावी भाष्य केले आहे. खऱ्या मर्दानींना चित्रपटातील `मर्दानी`ची ओळख करून दयावी व महिला कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी हा चित्रपट दाखविण्यात आला. यातील काही वास्तववादी संवाद तर महिला पोलिसांना इतके आवडले की त्यांनी टाळ्या वाजविल्या. महिला अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना पुरूषी अहंकाराचा कसा सामना करावा लागतो, यावरही यात चपखल भाष्य करण्यात आले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com