खाकीतील 'ती'च्यावर जाळे टाकणारा गजाआड! 

गंजमाळ येथील रमेश जाधव याने मध्यरात्रीचे सावज म्हणून ठक्कर बझार बसस्थानकावर उभ्या असलेल्या महिलांना हटकत लगट करण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्यांना तो संकटग्रस्त अबला समजत होता, त्या पोलिसांच्या निर्भया पथकातील रणरागीणी निघाल्या. त्यामुळे त्याला गजाआड व्हावे लागले.
Nashik Women Police Nirbhaya Squad Arrested Eve Teaser
Nashik Women Police Nirbhaya Squad Arrested Eve Teaser

नाशिक : शहरातील ठक्कर बझार बसस्थानकात मध्यरात्री एकट्या महिलेला गाठून तिचा विनयभंगाचा प्रयत्न करणाऱ्यांचे स्टिंग ऑपरेशन करून जेरबंद करण्याच्या घटनेला 24 तास होत नाहीत, तोच आणखी एकाला तशाच रीतीने जेरबंद करण्यात आले. 25 वर्षीय युवकाला अटक करून त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. निर्भया पथकाच्या महिला पोलिसांच्या 'डिकॉय स्टिंग ऑपरेशन' मुळे महिलांच्या सुरक्षिततेला बळ मिळाले.

गंजमाळ येथील रमेश जाधव याने मध्यरात्रीचे सावज म्हणून ठक्कर बझार बसस्थानकावर उभ्या असलेल्या महिलांना हटकत लगट करण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्यांना तो संकटग्रस्त अबला समजत होता, त्या पोलिसांच्या निर्भया पथकातील रणरागीणी निघाल्या. त्यामुळे त्याला गजाआड व्हावे लागले. हे सर्व घडले ते आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या संकल्पनेतील निर्भया पथकाच्या स्टींग ऑपरेशनमुळे.

पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या संकल्पेतून निर्भया पथकातील महिला पोलिस रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेडखानी करणाऱ्यांचे थेट स्टिंग ऑपरेशन करून त्यांच्या मुसक्‍या आवळण्यात येत आहेत. सोमवारी मध्यरात्री ठक्कर बझार बसस्थानकात साध्या वेशातील महिला पोलिस अधिकाऱ्याचा पाठलाग करून अश्‍लील हावभाव करणाऱ्या संशयिताला जेरबंद केले. या घटनेला 24 तास उलटत नाहीत, तोच मंगळवारी रात्रीही निर्भयाच्या महिला पोलिसांनी मध्यवर्ती बसस्थानक येथे रमेश जाधव यास अटक केली. 

मंगळवारी रात्री दहा ते बाराच्या दरम्यान निर्भया पथकाने पुन्हा सीबीएसबाहेर सापळा रचला. साध्या वेशातील महिला पोलिस रिक्षाची वाट पाहत होती. त्या वेळी संशयित रमेश जाधव याने तिच्याकडे पाहून शिटी वाजविली, तसेच तिचा पाठलागही केला. दबा धरून असलेल्या निर्भया पथकाने संशयित जाधवचे चित्रीकरण करून त्यास पकडले. सरकारवाडा पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. ही कारवाई निर्भया पथकाच्या पोलिस उपनिरीक्षक नेहा सूर्यवंशी, महिला पोलिस नाईक ए. एन. पाटील, महिला पोलिस शिपाई एस. एस. आवारे, पोलिस शिपाई ए. बी. राजपूत, हवालदार एस. वाय. पाडवी यांच्या पथकाने केली. संशयित जाधव यास न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com