फवारणी करणाऱ्या नगरसेविका हेमलता पाटील यांचे न्यायाधिशांनीही केले कौतुक!

नाशिक येथील कॉंग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील मात्र गेले तीन दिवस आपल्या प्रभागात गल्लोगल्ली फवारणी करीत फिरत आहेत. नागरीकांना सावधानता बाळगण्याच्या सुचना करीत आहेत
Nashik Women Corporator Spraying Disinfectancts in Ward
Nashik Women Corporator Spraying Disinfectancts in Ward

नाशिक : 'कोरोना'मुळे सगळीकडे लॉकडाऊन आहे. त्यामुळे तुमचे नगरसेवक तुम्हाला भेटले का? असा टोमणा सोशल मिडीयावर फिरत आहे. येथील कॉंग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील मात्र गेले तीन दिवस आपल्या प्रभागात गल्लोगल्ली फवारणी करीत फिरत आहेत. नागरीकांना सावधानता बाळगण्याच्या सुचना करीत आहेत. त्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत गल्लोगल्ली दर्शन देणाऱ्या या नगरसेविका वेगळ्याच ठरल्या आहेत.

राज्यभर 'कोरोना' विरोधात मुख्यमंत्र्यांपासून तर प्रशासनातील प्रत्येक लहान मोठा अधिकारी कर्मचारी सक्रीय आहे. एकवीस दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केल्यावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. अशा स्थितीत सोशल मिडीयावर 'अजून एकही पत्रकार, कोरोना ग्रस्ताची मुलाखत घ्यायला गेला नाही', 'तुमचा नगरसेवक तुम्हाला भेयाटला आला का?', 'आमदार-खासदार काय करतात?' असे खोचक प्रश्‍न सतत फिरत असतात. मात्र, अनेक लोकप्रतिनिधी, पोलिस, कर्मचारी त्याला अपवाद ठरले आहेत. या संकटाच्या काळात त्यांचे काम अधिक उजळपणे नागरिकांपुढे आले आहे. 

कॉंग्रेसच्या प्रवक्‍त्या आणि नगरसेविका डॉ. हेमलता पाटील गेल्या तीन दिवसांपासून आपल्या प्रभागात सकाळपासून सायंकाळपर्यंत कोरोना प्रतिबंधासाठी औषध फवारणी करण्यात व्यग्र आहेत. प्रत्येक भागात जाऊन त्या फवारणी करतात. फवारणीचा ट्रॅक्‍टर फिरत असताना समर्थक कार्यकर्तेही त्यांच्यासोबत असतात. यावेळी नागीरकांना भेटून अडचणी, सुचनाही विचारतात. चार नगरसेवकांचा प्रभाग असल्याने त्यात आपला कोणता, परका कोणता असा फरक करता येत नाही. त्यामुळे त्यांनी सबंध प्रभागात स्वतः फिरून फावरणी केली आहे. सकाळी सुरु झालेली फवारणी अगदी रात्रीही सुरु असते. त्या न थकता त्यासोबत फिरून फवारणीवर देखरेख ठेवतात.

फवारणी दरम्यान अनेक नागरीक देखील तेव्हढाच चांगला प्रतिसाद देत त्यांची विचारपुस करतात. शासकीय कर्मचारी व न्यायाधीशांची वसाहत या प्रभागात आहे. तेथे फवारणीला गेल्यावर तर अनेकांनी समाधान व्यक्त केले. एका न्यायाधिशांनी त्यांची विचारपुस करुन 'तुम्ही आधी पाणी घ्या' अशा शब्दांत आपुलकी व्यक्त केल्याने नगरसेविका पाटील यांनाही आपल्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान मिळाले.

सबंध प्रभागात फवारणी केल्यावर नागरीकांनी मला भेटून समाधान व्यक्त केले. सबंध शहरात अशी फवारणी व्हावी अशी सूचना अनेकांनी केली. महापौरांशी भेटून त्याचे नियोजन करता येईल. त्यासाठी मी प्रयत्नशील आहे - डॉ. हेमलता पाटील, नगरसेविका

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com