नाशिक पश्चिम : भाजपच्या सीमा हिरेंना आव्हान देण्यास शिवसेनेचे इच्छुक मैदानात 

नाशिक पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात युतीचे हेमंत गोडसे यांना हमखास आघाडी मिळेल असा दाव त्यांचे समर्थक करतात. मात्र या दाव्यामुळेच युतीत अडचणी येण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या सीमा हिरे येथील विद्यमान आमदार असल्याने उमेदवारीवर त्यांचाच दावा आहे. शिवसेना भाजपची युती आहे. मात्र, विधानसभेसाठी भाजपचे डॉ. प्रशांत पाटील, शिवसेनेकडून नगरसेवक सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, माजी महापौर विनायक पांडे यांची नावे स्पर्धेत आहेत. यातील काही नावांमुळे मतदारसंघात राजकीय भुकंपाची चिन्हे आहेत.
Nana Mahale - Seema Hire - Sudhakar Badgujar
Nana Mahale - Seema Hire - Sudhakar Badgujar

नाशिक : नाशिक पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात युतीचे हेमंत गोडसे यांना हमखास आघाडी मिळेल असा दाव त्यांचे समर्थक करतात. मात्र या दाव्यामुळेच युतीत अडचणी येण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या सीमा हिरे येथील विद्यमान आमदार असल्याने उमेदवारीवर त्यांचाच दावा आहे.  शिवसेना भाजपची युती आहे. मात्र, विधानसभेसाठी  भाजपचे डॉ. प्रशांत पाटील, शिवसेनेकडून नगरसेवक सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, माजी महापौर विनायक पांडे यांची नावे स्पर्धेत आहेत. यातील काही नावांमुळे मतदारसंघात राजकीय भुकंपाची चिन्हे आहेत. 

लोकसभा निवडणुकीच्या तोफा थंडावत नाहीत, तोच विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. पश्‍चिम विधानसभा मतदरसंघातही तयारी सुरू झाली आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अपूर्व हिरे, नानासाहेब महाले यांची नावे इच्छुकांच्या यादीत आहेत, तर भाजपकडून विद्यमान आमदार सीमा हिरे, महापालिकेचे सभागृहनेते दिनकर पाटील, शशिकांत जाधव यांची नावे चर्चेत आहेत. लोकसभा निवडणुकीत युती झाल्याने विधानसभेतही युती होईल, अशी अपेक्षा शिवसेनेला असल्याने सर्वाधिक नगरसेवक असलेल्या या मतदारसंघाची जागा शिवसेनेला हवी आहे. त्यादृष्टीने येथून दिलीप दातीर, सुधाकर बडगुजर, विलास शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. 

मनसेकडून अनिल मटाले यांचे नाव इच्छुकांमध्ये आहे. 3.80 लाख मतदार असलेल्या या मतदारसंघात सिडको भागात खानदेश मतदारांचे प्रमाण अधिक आहे, तर सातपूर व अंबड भागात उत्तर भारतीय मतदारांचे प्रमाण अधिक आहे. या मतदारसंघात शिवसेना, भाजपची ताकद मोठी असली तरी लाटेवर देखील येथील मतदार स्वार होतात, हा इतिहास आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी सोप्या असलेल्या या मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी अनेक इच्छुक आहेत. भाजप, शिवसेनेची युती होईल की नाही, हे अद्याप निश्‍चित नसले तरी भाजपकडून अनेकांनी तयारी केली आहे. परंतु अचानक नवीन नावांचादेखील विचार होऊ शकतो, अशी चर्चा रंगली असून, त्यात डॉ. प्रशांत पाटील यांचे नाव येण्याची चर्चा आहे. 

शिवसेनेकडून माजी महापौर विनायक पांडे यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र पांडे यांनी यापूर्वी महापौर असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने तो राग पक्षश्रेष्ठींच्या मनात आहे. त्याशिवाय महापालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपावेळी शिवसेनेत झालेला राडाही पक्षश्रेष्ठींच्या डोळ्यासमोर असल्याने पांडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. सोनालीराजे-पवार यांचे नाव राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून येण्याची शक्‍यता व्यक्त केली जात असली तरी त्यात तथ्य नसल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. हिरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराची फेरी पूर्ण केली असून, आतापासूनच त्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com