भाजप, शिवसेनेत उमेदवारीचा खेळ; राष्ट्रवादीच्या अपूर्व हिरेंचा घरोघरी प्रचार 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अपूर्व हिरे यांनी सिडको परिसरातील रहिवाश्‍यांच्या घरोघरी जाऊन संवाद दौरा सुरु केला आहे. या दौऱ्यात नागरीकांनी त्यांच्याकडे समस्यांचा पाढाच वाचला. त्रिमूर्ती चौक, सावतानगर, रायगड चौक, पवननगर, सप्तशृंगी चौक, राजरत्न नगर, लोकमान्यनगर, भगतसिंग चौक अशा विविध परिसरातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेऊन प्रचार सुरु केला. या दरम्यान नागरिकांनी अनेक तक्रारी मांडल्या.
NCP Aspirant Apporva Hirey Started Door To Door Campaign
NCP Aspirant Apporva Hirey Started Door To Door Campaign

नाशिक : नाशिक पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे विद्यमान आमदार आहेत. शिवसेनेला हा मतदारसंघ हवा आहे. भाजपमध्ये इच्छुकांची जत्रा आहे. यामध्ये युतीच्या दोन्ही घटकांत उमेदवारीचा खेळ रंगला आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. अपूर्व हिरे यांनी सबंध मतदारसंघात नेटवर्क उभारले आहे. जणू दोन दिवसांनीच मतदान आहे अशा तऱ्हेने त्यांचा घरोघरी जाऊन संपर्क सुरु झाला. राष्ट्रवादीने येथे भाजपला थेट आव्हान दिल्याने निवडणूक रंगली आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अपूर्व हिरे यांनी सिडको परिसरातील रहिवाश्‍यांच्या घरोघरी जाऊन संवाद दौरा सुरु केला आहे. या दौऱ्यात नागरीकांनी त्यांच्याकडे समस्यांचा पाढाच वाचला. त्रिमूर्ती चौक, सावतानगर, रायगड चौक, पवननगर, सप्तशृंगी चौक, राजरत्न नगर, लोकमान्यनगर, भगतसिंग चौक अशा विविध परिसरातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेऊन प्रचार सुरु केला. या दरम्यान नागरिकांनी अनेक तक्रारी मांडल्या. हा प्रामुख्याने औद्योगिक कामगारांचा पिरसर आहे. उद्योग बंद झाल्याने कामगारांचे रोजगार जात आहेत. अनेकांना घरी बसावे लागले. त्यामुळे कामगार, मतदारांतील ही नाराजी प्रचारात व्क्त होत असल्याचे चित्र आहे. 

भाजपच्या विद्यमान आमदर सीमा हिरे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. मात्र, भाजपमध्येच महापालिका सभागृह नेते दिनकर पाटील, उद्योग आघाडीचे प्रदिप पेशकार, निमाचे अध्यक्ष नगरसेवक शशीकांत जाधव, निवृत्त अभियंता दिलीप भामरे अशी मोठी लांबलचक यादी आहे. दुसरीकडे शिवसेनेने या मतदारसंघांवर दावा सांगितला आहे. युतीचे नेते, इच्छुकांत हा उमेदवारीचा खेळ चाले अशी स्थिती आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रचार सुरु झाल्याने नाशिक पश्‍चिम मतदारसंघात निवडणूकीचे वातावरण चांगलेच रंगले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com