भाजप, शिवसेनेतच बंडाळीच्या संकेतांनी भाजप आमदार सीमा हिरेंच्या मार्गात भुसुरुंग? 

पश्‍चिम मतदारसंघ कोणाचा बालेकिल्ला? शिवसेना म्हणते आमचा. भाजप म्हणते फक्त आमचा. बालेकिल्ला कोणाचा या चर्चेत दोन्ही पक्षातील अनेक नेते फक्त इच्छुक नव्हे तर 'अभी नही तो कभी नही' च्या विचाराने थेट तयारीत व्यग्र आहेत. हाकारे पिटणाऱ्या या नेत्यांच्या पुढे भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्याकडे 'निष्ठावंत' हा रामबाण आहे. त्यामुळे निवडणूक जशी जवळ येते आहे, तशी अनिश्‍चितता वाढल्याने निवडणुकीत भाजप आमदार हिरे यांच्या मार्गात पेरलेले भुसुरुंग निस्तरण्याचे आव्हान आहे.
भाजप, शिवसेनेतच बंडाळीच्या संकेतांनी भाजप आमदार सीमा हिरेंच्या मार्गात भुसुरुंग? 

नाशिक : पश्‍चिम मतदारसंघ कोणाचा बालेकिल्ला? शिवसेना म्हणते आमचा. भाजप म्हणते फक्त आमचा. बालेकिल्ला कोणाचा या चर्चेत दोन्ही पक्षातील अनेक नेते फक्त इच्छुक नव्हे तर 'अभी नही तो कभी नही' च्या विचाराने थेट तयारीत व्यग्र आहेत. हाकारे पिटणाऱ्या या नेत्यांच्या पुढे भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्याकडे 'निष्ठावंत' हा रामबाण आहे. त्यामुळे निवडणूक जशी जवळ येते आहे, तशी अनिश्‍चितता वाढल्याने निवडणुकीत भाजप आमदार हिरे यांच्या मार्गात पेरलेले भुसुरुंग निस्तरण्याचे आव्हान आहे. 

हा मतदारसंघ निवडणुकीच्या घोषणेआधीच चर्चेत आहे. दोन डझनहून अधिक इच्छुकांची तयारी हे त्याचे कारण आहे. गंमत म्हणजे भाजपकडे तर अगदी गल्लीत ओळख नाही पण मात्र वरिष्ठांकडे उठबस असलेल्यांचे उद्योग जोमात आहेत. भाजप- शिवसेना युती होणार की नाही मात्र 'अभी नही तो कभी नही' असा हा सगळ्यांचा ध्यास आहे. निवडणूक लढवायचीच असा विडा अनेकांनी उचलला आहे. येथे युतीचे चौव्वेचाळीस नगरसेवक आहेत. त्यावर सगळ्यांचे इमले उभारले जात आहेत. शिवसेना व भाजपची समसमान ताकद आहे. प्रभाग समितीवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून मतदारसंघावर दावा केला जातो. त्यामुळे युती झाली तर बंडखोरी, नाही झाली तरी हमखास बंडखोरी अशी स्थिती आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी यापूर्वीच जाहीर झाल्याने राष्ट्रवादीने मतदारसंघाचा कोपरान्‌ कोपरा पिंजून काढत ताकद निर्माण केली आहे. त्यामुळे येथील निवडणूक रंजक ठरणार हे नक्की. 

लोकसभेला येथे शिवसेना उमेदवाराला एक लाखापेक्षा अधिक मताधिक्‍य मिळाल्याने शिवसेनेच्या आशा पल्लवित झाल्या. नगरसेवक विलास शिंदे, माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, स्थायी समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे, दिलीप दातीर हे पारंपरिक विरोधक उमेदवारीसाठी शिवसेनेत इच्छुक आहेत. या चौघांत उमेदवारी कोणाला, याची उत्सुकता आहे. प्रत्यक्षात भाजपचे विद्यमान आणदार असल्याने मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला तर हा विषय आहे. अन्यथा येथे बंडखोरी शक्‍य आहे. 

शिवसेनेबरोबरच भाजपमध्येही इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. शिवसेनेला मताधिक्‍य मिळाले असले तरी त्यात भाजपच्या मतांचा वाटा अधिक असल्याचा दावा केला जात आहे. आमदार हिरे रिंगणात आहेत. त्यांना पक्षातूनच डझनभर इच्छुकांची आडकाठी आहे. पक्षांतर्गत स्पर्धकांवर त्या कशी मात करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. माजी सभागृहनेते दिनकर पाटील यांचे मोठे आव्हान आहे. महापालिका निवडणुकीपासून या दोघांत वाद आहेत. यात सर्वात मोठे नाव पुढे येत आहेत ते माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचे चुलत बुंध व पाटबंधारे विभागातून खास निवडणुकीसाठी स्वेच्छा दिलीप भामरे यांचे. स्थानिक नेत्यांत त्यांचे नाव नसले तरी उमेदवारीचा शंभर टक्के दावा त्यांनी केला आहे. डॉ. प्रशांत पाटील, "निमा'चे अध्यक्ष, नगरसेवक शशिकांत जाधव, सभागृहनेते सतीश सोनवणे, उद्योग आघाडीचे प्रदीप पेशकार हे अशी उमेदवारांची गर्दी म्हणावी की खिचडी हा प्रश्‍न आहे. भाजपमधील इच्छुकांच्या या सुप्त इच्छा म्हणजे आमदार हिरे यांच्या मार्गातील राजकीय भुसुरुंग ठरण्याची शक्‍यता आहे. 

2014 विधानसभेचे मतदान 
सीमा हिरे (भाजप)- 67,489 
सुधाकर बडगुजर (शिवसेना) - 37,819 
शिवाजी चुंभळे (राष्ट्रवादी कॉंग्रेस) - 03,236 
दशरथ पाटील (कॉंग्रेस) - 21,981 
डी. एल. कराड (माकप)- 16,970 
नितीन भोसले (मनसे) - 8,712 

2019 लोकसभेचे मतदान 
हेमंत गोडसे (शिवसेना) - 1,44,144 
समीर भुजबळ (राष्ट्रवादी) - 40,859 
माणिकराव कोकाटे (अपक्ष) - 6,719 
पवन पवार (वंचित आघाडी) - 20,784 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com