डॉ. अपूर्व हिरेंच्या उमेदवारीला भाऊसाहेब हिरेंचा विकास, लोकसंपर्काचा वारसा

महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी मंत्रीपदाचा त्याग करणारे (कै) भाऊसाहेब हिरे महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव असलेले नाव. या घराण्याचा पुरोगामी, विकासाचा वारसा असलेले उमेदवार म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अपूर्व हिरे यंदा नाशिक पश्‍चिम मतदारसंघातून उमेदवार आहेत. हिरे घराण्याशी सर्वसामान्यांचा वर्षानुवर्षे स्नेह आहे. हा स्नेह मतांत रुपांतरीत होणार का, याचीच सगळीकडे चर्चा आहे.
Nashik West Constituency Apporva Hirey Election Campaign
Nashik West Constituency Apporva Hirey Election Campaign

नाशिक : महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी मंत्रीपदाचा त्याग करणारे (कै) भाऊसाहेब हिरे महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव असलेले नाव. या घराण्याचा पुरोगामी, विकासाचा वारसा असलेले उमेदवार म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अपूर्व हिरे यंदा नाशिक पश्‍चिम मतदारसंघातून उमेदवार आहेत. हिरे घराण्याशी सर्वसामान्यांचा वर्षानुवर्षे स्नेह आहे. हा स्नेह मतांत रुपांतरीत होणार का, याचीच सगळीकडे चर्चा आहे.

नाशिक पश्‍चिम मतदारसंघ यंदा विविध अर्थाने चर्चेत आहे. येथे भाजपच्या उमेदवार, विद्यमान आमदार सीमा हिरे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. अपूर्व हिरे यांचे आवाहन आहे. दुसरी चर्चा आहे ती भाजप- शिवसेना महायुतीतील समन्वयाचा अभाव. येथे शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांनीच बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी केली आहे. त्यांना पक्षाच्या बावीस नगरसेवकांनी उघड पाठींबा दिला आहे. महायुतीला ही अर्धशीषीची बाधा असतांनाच शिवसेनेचे दुसरे नगरसेवक व स्थानिक प्रभाव असलेले दिलीप दातीर यांनी मनसेकडून उमेदावरी केली आहे. महायुतीची ही वजाबाकी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हिरेंच्या पत्थ्यावर पडली आहे.

नाशिक पश्‍चिम मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार डॉ. अपूर्व हिरे यांच्या प्रचारार्थ रोज कार्यकर्त्यांचे मेळावे होत आहेत. या मतदारसंघात प्रामुख्याने कळवण, सटाणा, मालेगाव, धुळे परिसरातील खानदेशी मतदारांची लक्षणीय संख्या आहे. गेली सत्तर वर्षे राजकारण, समाजकारण, सहकार, शिक्षण अशा विविध क्षेत्रात सक्रीय असलेल्या हिरे कुटुंबिय मुळचे मालेगावचे आहे. माजी मंत्री पुष्पाताई हिरे, माजी राज्यमंत्री प्रशांत हिरे त्यांच्या प्रचारात सक्रीय आहे. यातून हिरे घराण्याशी सर्वसामान्यांचा वर्षानुवर्षे स्नेह आहे. शेकडो नागरीक त्यांच्या प्रचारात सक्रीय झालेले दिसतात. त्यामुळे अपूर्व हिरे यांचा संपर्क, नियोजन व प्रचार तिन्हींतून मतदारसंघातील सध्याची राजकीय समीकरणे त्यांच्या पत्थ्यावर पडतील का? याचीच सध्या चर्चा आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com