खडसेंचा अपमान करण्याची ताकद आमच्यात नव्हती : बावनकुळे यांचं वक्तव्य

पंकजा मुंडे या पक्षावर नाराज नाहीत. त्या पक्ष सोडून जाणार नाहीत, असे त्यांनीच सांगितले आहे.
खडसेंचा अपमान करण्याची ताकद आमच्यात नव्हती : बावनकुळे यांचं वक्तव्य
We did not have strength to insult Eknath Khadse says BJP

जळगाव : एकनाथ खडसे यांना भारतीय जनता पक्षात कधीही अपमानजनक वागणूक देण्यात आली नाही. देवेंद्र फडणवीस हे सुध्दा त्यांना नेतेच मानत होते. त्यांच्याच सल्ल्याने ते काम करीत होते. खडसे यांचा जाणीवपूर्वक अपमान करण्याची ताकद आमच्या कोणाच्यातच नव्हती, असे वक्तव्य भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलं आहे. We did not have strength to insult Eknath Khadse says BJP

भारतीय जनता युवा मोर्चाच्या युवा वॅारिअर उपक्रमासाठी चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवारी जळगाव जिल्ह्यात आले आहेत. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी खडसे यांच्याविषयीच्या प्रश्नावर हे उत्तर दिलं. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील आदी उपस्थित होते.

खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाविषयी बोलताना बावनकुळे म्हणाले, आम्ही सर्व जण त्यांचे नेतृत्व मान्य करीत होतो. परंतु आपल्यावर अन्याय होत आहे, असे त्यांना का वाटले याची मला माहिती नाही. कुठे तरी विरोधी पक्षाने संभ्रम तयार केल्याने ते राष्ट्रवादीत गेले. पण आता खडसे यांची परिस्थिती काय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करूनही त्यांना अद्याप मंत्रिपद दिले नाही. त्यांना प्रवेश केल्यावर ताबडतोब मंत्रिपद का दिले नाही. त्यांना आता का रखडवले जात आहे, असा सवालही बावनकुळे यांनी उपस्थित केला.

खडसेंचे भाजप वाढविण्यात मोठे योगदान असून  राज्याच्या विकासासही त्यांनी हातभार लावला आहे. पक्षात त्यांचा आदरच केला जात होता. देवेंद्र फडणवीस आणि आमच्या सर्वांचेच ते नेते होते. त्यांच्यावर कुणी अन्याय करेल, एवढी हिंमत नव्हती. राष्ट्रवादीत जाण्याबाबत विरोधकांनी विरजण घालत दुधाचे दही केल्याची टीका बावनकुळे यांनी केली.

पंकजानाही विरोधक बदनाम करत आहेत

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे या पक्षावर नाराज नाहीत. त्या पक्ष सोडून जाणार नाहीत, असे त्यांनीच सांगितले आहे. मात्र कुठे तरी झारीतील शुक्राचार्य त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते आमच्या पक्षातील नाहीत तर विरोधी पक्षातील आहेत. जाणीपूर्वक त्यांच्या वकव्याचा विपर्यास करून त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र विरोधी पक्ष करत आहे. विरोधकांनी हे षडयंत्र थांबवावे, असे आवाहनही बावनकुळे यांनी केले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in