राज्यातील पूरग्रस्त सहा जिल्ह्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय - chhagan bhujbal says government will provide free ration to flood affected-sj84 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

राज्यातील पूरग्रस्त सहा जिल्ह्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 जुलै 2021

महाराष्ट्रात महापुरामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. यामुळे जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. 

नाशिक : महाराष्ट्रात महापुरामुळे (Maharashtra Floods) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. यामुळे जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरे, शेती आणि रस्ते पुरामुळे वाहून गेले आहेत. या पूरग्रस्तांना मदत म्हणून राज्य सरकारकडून (State Government) मोफत अन्न-धान्य आणि केरोसीनचे वाटप केले जाणार आहे, अशी माहिती अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

भुजबळ म्हणाले की, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा आपत्तीग्रस्त जिल्ह्यात प्रति कुटुंब 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ आणि पाच लिटर केरोसिनचा मोफत पुरवठा करण्यात येईल. गहू नको असेल त्यांना तांदूळ दिले जातील. प्रत्येक कुटुंबाला 5 किलो डाळ देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. अतिवृष्टीचा फटका काही जिल्ह्यांना बसला आहे. नैसर्गिक संकटाशी लढताना सरकार हे जनतेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये शिवभोजन थाळ्या दुप्पट करण्यात आल्या आहेत. पूरग्रस्त भागातील शिवभोजन केंद्रावर आत्ता दुप्पट क्षमतेने शिवभोजन थाळीचे वितरण केले जाईल.

पुरामुळे अनेक जिल्ह्यांत वीज पुरवठा खंडित झाला आहे. अशा ठिकाणी मोफत केरोसीनचे वाटप करण्यात येईल. ठिकाणी शिवभोजन केंद्र वाहून गेल्यास अथवा पाण्यात असल्यास तेथे इतर ठिकाणांवरून शिवभोजन पाकिटे वितरीत करण्याची परवानगी दिली आहे. पाकिटांच्या वितरणासाठी त्याचप्रमाणे वीज नसलेल्या ठिकाणी किंवा शिवभोजन अॅपसाठी कनेक्टिव्हिटी नसलेल्या ठिकाणी थाळीच्या नोंदणीसाठी स्थानिक पातळीवर तहसीलदार त्यांच्या यंत्रणेचा वापर करणार आहेत, असे भुजबळ यांनी सांगितले. 

हेही वाचा : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गिरीश महाजन उतरले थेट कोकणात 

राज्यात विविध ठिकाणी अतिवृष्टीमुळे काही नागरिकांना दुर्घटनांमध्ये जीव गमवावा लागला आहे. त्या मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असल्याची भावना व्यक्त करत भुजबळ यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख