काँग्रेसच्या भावी पंतप्रधानांनी अफगाणिस्तानात जावं! खासदार उन्मेष पाटलांचं वादग्रस्त ट्विट

खासदार उन्मेष पाटील हे ट्विटर वरून कायम टीका करीत असतात, त्यांचा रोख काँग्रेस नेत्यांवर अधिक असतो.
BJP MP Unmesh Patils controvercial tweet about Rahul Gandhi
BJP MP Unmesh Patils controvercial tweet about Rahul Gandhi

जळगाव : अफगाणिस्तानात तालिबान्यांनी सत्ता काबीज केल्यानंतर जगभरात खळबळ उडाली. भारतातही त्याचे पडसाद उमटले आहेत. या घटनेवरून देशातील अनेक नेत्यांनी अफगाणिस्तानविषयी सहानुभूती व्यक्त केली आहे. पण भाजपचे जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी याचंही राजकारण करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. (BJP MP Unmesh Patils controvercial tweet about Rahul Gandhi)

खासदार उन्मेष पाटील हे ट्विटर वरून कायम टीका करीत असतात, त्यांचा रोख काँग्रेस नेत्यांवर अधिक असतो. अफगाणिस्तानात होत असलेल्या सत्ता बदलावरून त्यांनी काँग्रेस नेत्यावर खोचक टीका आहे. काँग्रेसकडून राहुल गांधी यांचा भावी पंतप्रधान असा उल्लेख केला जातो. अफगाणिस्तानचे अध्यक्ष कोण होणार, याबाबत अद्याप अस्पष्टता आहे. त्या अनुषंगाने खासदार पाटील यांनी टीका केली आहे. 

'अफगाणिस्तान मध्ये पंतप्रधानपद रिक्त झाले आहे, काँगेसच्या भावी पंतप्रधान यांनी भारतात वेळ न घालवता तिकडे संपर्क साधावा', असं ट्विट पाटील यांनी केलं आहे. त्यांनी हे ट्विट काँग्रेससह भाजपलाही टॅग केले आहे. या टीकेवर अद्याप तरी राज्यातील कोणत्याही काँग्रेस नेत्यांनी उत्तर दिलेले नाही. भाजप नेत्यांकडून सतत राहुल गांधी यांना लक्ष्य केलं जात. पण पाटील यांनी थेट अफगाणिस्तानात जाण्याबाबत म्हटल्यानं त्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. 

खासदारावर देशद्रोहाचा गुन्हा

समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेशातील खासदार शफिकूर रहमान बर्क यांच्यासह इतर दोघांविरुद्ध पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत चंबळ जिल्ह्याचे पोलीस अक्षीक्षक चरखेश मिश्रा म्हणाले की, त्यांनी तालिबानबद्दल चिथावणीखोर वक्तव्य केले होते. त्यांनी तालिबान्यांची तुलना भारतीय स्वातंत्र्यसैनिकांशी केली होती. त्यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करावा, असेही त्यांनी म्हटले होते. भारत सरकारने तालिबानला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. यामुळे त्यांचे वक्तव्य देशद्रोह असून, या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

बर्क म्हणाले होते की, तालिबानला अफगाणिस्तानला स्वांतत्र्य मिळवून द्यायचे होते. त्यांना त्यांचा देश स्वत:च चालवायचा होता. त्यांनी रशियाला आणि अमेरिकेला अफगाणिस्तानमध्ये बस्तान बसवून दिले नाही. आता सध्या अफगाणिस्तानमध्ये जे घडत आहे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. यात आपण हस्तक्षेप करु नये. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com