'राष्ट्रवादी'च्या रावसाहेब भालेरावांचा अनोखा उपक्रम; विद्यार्थीनींच्या प्रवासाची जबाबदारी घेत दिले 3 लाख'

कधीकाळी महाराष्ट्रभर विड्याच्या पानाचे मळे असलेले वडनेर भैरव हे प्रगतीशील गाव. सध्या येथे प्रत्येक शेतकरी द्राक्षांचे पीक घेतो. निर्यातक्षम द्राक्षांसाठी या गावाची ख्याती साता समुद्रापार पोहोचली आहे. मात्र, कुटुंबातील प्रत्येक सदस्य महिलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत दिवसभर द्राक्षबागेच्या व्यवस्थापनात गुंतुन पडतो. त्यात मुलींना महाविद्यालयात जायचे तर तालुक्‍याच्या ठिकाणी सोडणार कोण, असा प्रश्न येतो. त्यासाठी आता ग्रामपंचायतीने निधी उभा केला आहे
Nashik Village Deputy Sarpanch Raosaheb Bhalerao Gave funds for College Girls Travellling
Nashik Village Deputy Sarpanch Raosaheb Bhalerao Gave funds for College Girls Travellling

नाशिक : 'मुलगी शिकली, प्रगती झाली' असे सगळेच म्हणतात. परंतु, गावातल्या सर्वच मुली शिकल्या तर सबंध गावाचीच प्रगती होईल का? या प्रश्‍नाचे उत्तर शोधता शोधता वडनेर भैरव (चांदवड) येथील सरपंच रावसाहेब भालेराव यांनी ती प्रत्यक्षात आणली. त्यासाठी ग्रामपंचायतीकडून 3.15 लाखांचा निधी महाविद्यालयास देऊन सर्वच मुलींना घरापासून तर महाविद्यालयापर्यंत वर्षभर मोफत प्रवासाची सोय केली. या अनोख्या उपक्रमाने विद्ययार्थीनी अन्‌ त्यांचे पालक दोन्हीही प्रचंड खूष आहेत.

कधीकाळी महाराष्ट्रभर विड्याच्या पानाचे मळे असलेले हे प्रगतीशील गाव. सध्या येथे प्रत्येक शेतकरी द्राक्षांचे पीक घेतो. निर्यातक्षम द्राक्षांसाठी या गावाची ख्याती साता समुद्रापार पोहोचली आहे. प्रत्येक घरापुढे चार चाकी वाहन उभे असते त्याची त्यांना कौतुकही वाटेनासे झाले आहे. मात्र, कुटुंबातील प्रत्येक सदस्य महिलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत दिवसभर द्राक्षबागेच्या व्यवस्थापनात गुंतुन पडतो. त्यात मुलींना महाविद्यालयात जायचे तर तालुक्‍याच्या ठिकाणी सोडणार कोण, असा प्रश्न येतो. बसची सुविधा आहे. मात्र, त्यासाठी दूर अंतरावर जावे लागते. त्यामुळे मुलींची गैरसोय होते. यातून मार्ग कसा काढायचा ही समस्या होती.

येथील उत्तमबाबा भालेराव हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अन्‌ माजी आमदार आहेत. त्यांचे पुतणे रावसाहेब उपसरपंच. या दोघांनीही विचार केला अन्‌ मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या महाविद्यालयाचे प्राचार्य अमोल भगत यांच्याशी चर्चा केली. त्यातून महाविद्यालयाने बस उपलब्ध करावी, त्यासाठी लागणारा सर्व खर्च ग्रामपंचायतीने द्यावा. असे ठरले. हा खर्च होता 3.15 लाख. त्यानंतर उपसरपंच रावसाहेब यांनी ग्रामपंचायत सदस्यांना त्यासाठी तयार केले. सर्वांनी एकमताने निधीचा धनादेश प्राचार्यांच्या हाती दिल्यावर आता गावातील 210 मुलींसाठी मोफत वाहतुक सेवा सुरु झाली आहे. थेट घरातून महाविद्यालयाला जायला बस येऊ लागल्याने पालक निश्‍चिंत झाले. मुलीही बेहद्द खुश आहेत. मुलींच्या शिक्षणासाठी गावाचा हा अनोखा पुढाकार चर्चेचा विषय ठरला आहे.

मोफत प्रवासाची योजना यापुढे कायम सुरु राहणार आहे. पिंपळगाव बसवंत, नाशिक, चांदवड येथे शिकणाऱ्या मुलींचाही येण्या - जाण्याचा प्रवास खर्च आम्ही देणार आहोत. मुलींनी भरपुर शिकावे व पालकांवर त्याचा भार पडू नये म्हणून हे छोटेसे योगदान आहे - रावसाहेब भालेराव, उपसरपंच

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com