आजचा वाढदिवस... बाळासाहेब सानप, माजी आमदार नाशिक - Todays Birthday...Ex MLA Balasaheb Sanap | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस... बाळासाहेब सानप, माजी आमदार नाशिक

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 30 जून 2021

भारतीय जनता जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, शहराचे माजी महापौर व माजी आमदार बाळासाहेब सानप हे कार्यकर्त्यांच्या मदतीला धाऊन जाणारे व बहुचर्चीत नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिक महापालिकेत भारतीय जनता पक्ष स्वबळावर सत्तेत आला.त्यांचा आज वाढदिवस आहे.

भारतीय जनता जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, (BJP`s senior leader, EX Mayor) शहराचे माजी महापौर व माजी आमदार बाळासाहेब सानप (Ex MLA Balasaheb Sanap) हे कार्यकर्त्यांच्या मदतीला धाऊन जाणारे व बहुचर्चीत नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिक महापालिकेत भारतीय जनता पक्ष स्वबळावर सत्तेत आला. 

श्री. सानप यांनी आपली राजकीय कारकिर्द काँग्रेस पक्षातून प्रारंभ केली. तळागाळातील कार्यकर्ते असलेल्या सानप यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून महापालिकेची उमेदवारी केली. त्यात पंचवटी भागातून श्रीकृष्ण नगर परिसराचे नगरसेवक झाले. त्यानंतर त्यांनी शहरातून सलग चार वेळा महापालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवला. भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर त्यांनी विविध पदे भूषविली. भाजपच्या परिवारातील संघटनांशी त्यांचा निकटचा संपर्क आहे. 

प्रभाग सभापती, उपमहापौर, महापौर व त्यानंतर पक्षाचे शहराध्यक्ष या पदावर त्यांनी काम केले. 2014 मध्ये झालेल्या निवडणूकीत ते नाशिक पूर्व मतदारसंघातून भाजपची उमेदवारी करून आमदार झाले.  त्यांनी 2017 मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणूकीत केलेल्या नियोजनामुळे व माजी मंत्री गिरीष महाजन यांचे विश्वासू सहकारी म्हणून केलेल्या प्रयत्नांतून नाशिक महापालिकेत भाजपची स्वबळावर सत्ता आणली. 

विधानसभा निवडणूकीत 2019 मध्ये पक्षांतर्गत स्पर्धेतून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे समर्थकांच्या आग्रहास्तव त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विधानसभेची उमेदवारी केली. त्यात त्यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र पक्षातील नेत्यांच्या आग्रहास्तव ते पुन्हा स्वगृही परतले.
...
हेही वाचा...

सलाम आजच्या हिरकणीला...9 दिवसांच्या लेकीसह पुष्पा बांबळे ग्रामपंचायत बैठकीत

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख