Nashik Standing Chairman and BJP Leader Row | Sarkarnama

21 कोटींच्या मोबदल्यावरुन भाजप नेते दिनकर पाटलांना हिमगौरी आडकेंनी खडसावले 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

स्थायी समिती सदस्यांनी 21 कोटींचा रोख मोबदला देण्याऐवजी टीडीआर स्वरूपात मोबदला देण्याची मागणी केल्यानंतर समितीने तसा ठराव केला; परंतू, प्रत्यक्षात संबंधित जागा मालकांना प्रभारी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी रोखीने मोबदला दिल्यानंतर पाटील यांनी आयुक्तांसह सभापती आहेर यांच्यावर टीका करत मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रार करण्याची भूमिका घेतली होती. धुळे महापालिका निवडणुकीनंतर सभापती सौ. आडके यांनी या प्रकरणावर भूमिका स्पष्ट करत पाटील यांना धारेवर धरले.

नाशिक : शहरातील मोकळ्या आरक्षित भूखंडाचा 21 कोटी मोबदला रोखीने देण्यात आला. यावरुन स्थायी समिती सभापती तथा भाजपच्या हिमगौरी आहेर-आडके यांना त्यांच्याच पक्षाच्या सभागृहनेते दिनकर पाटील यांनी धारेवर धरले. सौ. आहेर यांनी त्याला सडेतोड उत्तर दिले. ''आतापर्यंत पक्षशिस्तीसाठी खपवून घेतले. यापुढे वैयक्तिक टीका केल्यास याद राखा," असा सज्जड दमच त्यांनी दिला. 

स्थायी समिती सदस्यांनी 21 कोटींचा रोख मोबदला देण्याऐवजी टीडीआर स्वरूपात मोबदला देण्याची मागणी केल्यानंतर समितीने तसा ठराव केला; परंतू, प्रत्यक्षात संबंधित जागा मालकांना प्रभारी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी रोखीने मोबदला दिल्यानंतर पाटील यांनी आयुक्तांसह सभापती आहेर यांच्यावर टीका करत मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रार करण्याची भूमिका घेतली होती. धुळे महापालिका निवडणुकीनंतर सभापती सौ. आडके यांनी या प्रकरणावर भूमिका स्पष्ट करत पाटील यांना धारेवर धरले. 

2016 मध्ये न्यायालयाने 56 कोटींचा मोबदला देण्याचे आदेश केले. त्यापूर्वी संबंधित जागामालकाला काही प्रमाणात टीडीआर दिला आहे. उर्वरित मोबदला रोख घ्यायचा की टीडीआर, हा ऐच्छिक विषय असल्याने त्यानुसार जागामालकाने रोखीची मागणी केली होती. महापालिकेच्या नगरररचना विभागाने सुद्धा पाच वेळा टीडीआर स्वरूपात मोबदल्यासाठी प्रयत्न केले; परंतू, जागामालक रोखीवरच अडून बसल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार रोख रक्कम अदा करण्यात आली. या तांत्रिक बाबींचा विचार न करता बेछूट आरोप करण्यात आले. पक्षशिस्त म्हणून आतापर्यंत शांत बसण्याची भूमिका घ्यावी लागली. पण वैयक्तिक टीका होऊ लागल्याने ठोस भूमिका घ्यावी लागल्याचे सभापती आहेर यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख