पहाटे पाचला उठणे, भरपुर व्यायाम आणि रुबाबदार दिसण्याचा छंदामुळे 'फिट' : आमदार अनिल कदम     

आमदार कदम यांची पार्श्‍वभूमी ओझरच्या ग्रामीण भाग आणि शेतकरी कुटुंबाची आहे. मात्र त्यांचे शिक्षण 'कॉन्व्हेंट' शाळेत झाले आहे. त्यामुळे मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. ते रोज पहाटे पाच वाजता उठतात. जीममध्ये भरपुर व्यायाम करतात. पांडवलेणी, चामरलेणीचा डोंगर चढतात. सकाळीच त्यांना भेटणारे लोक गर्दी करतात. त्यामुळे सकाळी लवकर त्यांचा दिवस सुरु होतो.
पहाटे पाचला उठणे, भरपुर व्यायाम आणि रुबाबदार दिसण्याचा छंदामुळे 'फिट' : आमदार अनिल कदम     

नाशिक : रोज पहाटे पाचला उठतो. व्यायाम करतो. भरपुर घाम गाळतो. फीट राहतो. रुबाबदार दिसणे माझी आवड आहे. तेच माझ्या फिटनेसचे रहस्य आहे. त्याचा माझ्या राजकीय, सामाजिक जीवनात खुप फायदा होतो..... निफाडचे शिवसेना आमदार अनिल कदम आपल्या 'फिटनेस'बाबत सांगत होते.

निफाड (नाशिक) विधानसभा मतदारसंघाचे सलग दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करीत असलेले अनिल कदम यांचा वावर नेहेमीच उत्साही असतो. मतदार, अधिकारी वा अन्य कोणीही प्रत्येकाशी त्यांचा संवाद अगदी फाडफाड होतो. हलक्‍या फिकट रंगांचा कुर्ता- पायजमा तर अनेकदा अगदी जीन्स, टीशर्ट असा वेषही ते करतात. शारीरीक उंची व सडपातळ देहयष्टी आणि नियमित व्यायामामुळे त्यांच्यातील सळसळता उत्साह त्यांचे व्यक्तीमत्व खुलवतो. व्यक्तिमत्वातले हे पैलू निफाडच्या मतदारांतही चर्चेचा विषय राहीले आहेत. 

आमदार कदम यांची पार्श्‍वभूमी ओझरच्या ग्रामीण भाग आणि शेतकरी कुटुंबाची आहे. मात्र त्यांचे शिक्षण 'कॉन्व्हेंट' शाळेत झाले आहे. त्यामुळे मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. ते रोज पहाटे पाच वाजता उठतात. जीममध्ये भरपुर व्यायाम करतात. पांडवलेणी, चामरलेणीचा डोंगर चढतात. सकाळीच त्यांना भेटणारे लोक गर्दी करतात. त्यामुळे सकाळी लवकर त्यांचा दिवस सुरु होतो. दिवसभर नागरीकांचे दूरध्वनी, मतदारसंघातील विवाह, कौटुंबिक सोहळे व खाजगी कार्यक्रमांना हजेरी लावतात. 

मतदारसंघातील विकासकामांसाठी शासन, मंत्रालय व विविध स्तरावर त्यांचा सतत पाठपुरावा सुरु असतो. त्यानिमित्ताने प्रवास करावा लागतो. मात्र, त्यात ते थकत नाहीत, दमत नाहीत. याचे रहस्य त्यांच्या व्यायामात आहे. घाम गाळणे यातच माझा फिटनेस असल्याचे ते त्यांचे सहकारी व कार्यकर्त्यांना सांगतात. दिवसभरात अठरा तास ते काम करतात. सहा तासांची झोप त्यांना पुरेशी ठरते. व्यायामानंतर सकाळी लवकर जेवतात. त्यातही 'लो कॅलरी' अन्नावर त्यांचा भर असतो. सकाळी ते ज्वारीची भाकरी पसंत करतात. जेवणातून भात त्यांनी बंद केला आहे. रात्रीचे जेवण शक्‍यतो सायंकाळी सातला घेतात. उशीर झाल्यास जेवण टाळतात व फळांचे सेवन करतात. 

एकाच वेळी प्रगतीशील शेतकरी, बागाईतदार, झोपडपट्टीतील कार्यकर्त्यांत मिसळणारा कार्यकर्ता म्हणुन त्यांच्याकडे पाहिले जाते. ओझरचे ग्रामपंचायत सदस्य म्हणुन आपली राजकीय कारकीर्दीची त्यांनी सुरवात केली. त्यानंतर ओझरचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, सभापती, जिल्हा बॅंक संचालक आणि आमदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द आहे. आगामी 2019 मध्ये ते तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. आजपर्यंत त्यांनी पराभव पाहिलेला नाही. त्यामुळे भविष्यात काय होते याची उत्सुकता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com