भाजप विरोधात शंखनाद करीत नगरसेवकांनी शिवसेना कार्यालयाला ठोकले टाळे

शिवसेना- भाजप महायुतीत अजिबातच आलबेल नसल्याचे आज स्पष्ट झाले. नाशिक पश्चिम मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार सीमा हिरे यांच्या विरोधात शिवसेनेचे विलास शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. शिंदे यांना पाठींबा देण्यासाठी आज शिवसेनेचे 36 नगरसेवक व 350 पदाधिका-यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.
Nashik Shivsena Corporators in a Mood to Resign
Nashik Shivsena Corporators in a Mood to Resign

नाशिक : शिवसेना- भाजप महायुतीत अजिबातच आलबेल नसल्याचे आज स्पष्ट झाले. नाशिक पश्चिम मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार सीमा हिरे यांच्या विरोधात शिवसेनेचे विलास शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. शिंदे यांना पाठींबा देण्यासाठी आज शिवसेनेचे 36 नगरसेवक व 350 पदाधिका-यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. 

शिवसेनेच्या पदाधिका-यांची बैठक आज सकाळी अकराला सिडको येथे झाली. 'नाशिक पश्चिम मतदारसंघावर फक्त शिवसेनेचाच अधिकार आहे. येथे भगवा फडकलाच पाहिजे. भाजपने ठरवून या मतदारसंघात घुसखोरी केली आहे. त्यांनी युती धर्म पाळला नाही. हे खपवुन घेतली जाणार आहे,' असे सांगत शिवसेनेचा हा बालेकिल्ला अभेद्य ठेवण्यासाठी भाजप उमेदवाराचा पराभव करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. 

दरम्यान, नाशिक पश्चिममधील शिवसेनेची बंडखोरी रोखून शिवसेनेची मनधरणी करण्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांना अपयश आले आहे आज शिवसेनेच्या ३६ नगरसेवकांनी राजीनामास्त्र वापरत पक्षाच्या कार्यालयाला टाळे ठोकले. बंडखोर उमेदवार विलास शिंदेंच्या प्रचारात ते सहभागी होतील.

नाशिक पश्चिमचा जागा भाजपला सोडल्याने भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. या मतदार संघात भाजपने घुसखोरी केल्याचे सांगत शिंदेच्या समर्थनार्थ शिवसेनचे महानगर प्रमुख, पालिकेतील विरोधी पक्षनेते आणि 36 नगरसेवकांनी आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे भाजप आमदार सीमा हिरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com