सरकार येणार मुंबईला, उकळ्या फुटल्या नाशिकला!

राज्यभर भाजपच्या सत्तेचा वारु बेफाम उधळत होता. महापालिकेतही स्वबळावर सत्ता आली. पण जिल्हा परिषद दूर होती. यंदा भाजपसाठी सत्ता मिळणार तोच दुधात माशी पडावी तशी भाजपचे स्वप्न उधळले गेले. शिवसेनेचे सरकार मुंबईत स्थापन होईल, मात्र आनंदाच्या सर्वाधीक उकळ्या फुटताहेत त्या नाशिकला !
Balasaheb Sanap - Girish Mahajan
Balasaheb Sanap - Girish Mahajan

नाशिक : राज्यभर भाजपच्या सत्तेचा वारु बेफाम उधळत होता. महापालिकेतही स्वबळावर सत्ता आली. पण जिल्हा परिषद दूर होती. यंदा भाजपसाठी सत्ता मिळणार तोच दुधात माशी पडावी तशी भाजपचे स्वप्न उधळले गेले. शिवसेनेचे सरकार मुंबईत स्थापन होईल, मात्र आनंदाच्या सर्वाधीक उकळ्या फुटताहेत त्या नाशिकला !

नाशिक जिल्हा परिषदेत 73 सदस्य आहेत. सत्तेसाठी 37 हवेत. शिवसेनेचे 25 अन्‌ भाजपचे 16 हे गणित सहज जमते. मात्र, गेल्यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांची जादु चालली नाही. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी व अन्य पक्ष एकत्र आले अन्‌ सत्तेत बसले. यंदा ती चुक दुरुस्त करुन शिवसेनेचा अध्यक्ष, भाजपचा उपाध्यक्ष अन्‌ उर्वरीत चार सभापती दोघांचे असे 'आमच ठरलय' हे फक्त प्रत्यक्षात यायचे होते. मात्र, विधानसभेनंतर वारे फिरले. आता शिवसेनेचे 25 होते त्यातील धनराज महाले यांनी लोकसभेची उमेदवारी केल्याने 24 झाले. राष्ट्रवादीचे सोळा होते त्यात खासदार भारती पवार, आमदार नितीन पवार, आमदार हिरामन खोसकर हे तीन घटल्याने 13 झाले. कॉंग्रेसचे 8 होते. त्यातील उपाध्यक्ष नयना गावित शिवसेनेत गेल्याने तेव्हढेच राहिले.
माकपचे तीन, चार अपक्ष आहेत. यातील चारही अपक्ष सहज शिवसेनेकडे येतील. त्यामुळे जिल्हा परिषदेत महाशिवआघाडीचे बळ सहज 50 च्या पुढे जाते. 

महापालिकेत 122 सदस्य आहेत. त्यातील 66 नगरसेवक असल्याने महापौर, उपमहापौर, सभागृहनेते, स्थायी समिती सभापती ही सर्व सत्तेची पदे भाजपकडे होती. विरोधी पक्ष शिवसेनेकडे 34 आहेत. यातील भाजपच्या सरोज अहिरे, शिवसेनेचे दिलीप दातीर यांनी राजीनामे दिले आहेत. दोन्ही कॉंग्रेस, मनसे, अपक्षांची संख्या 19 आहे. अशा स्थितीत राज्यात सत्तांतर झाल्याने माजी मंत्री गिरीश महाजन यांना जामनेरहून सर्व कारभार हाकणे कितपत शक्‍य होईल? हा प्रश्न आहे. सत्ता नसल्यावर त्यांची जादुची कांडी प्रभाव दाखवील काय? हा देखिल प्रश्‍न आहे. 

महापालिकेतील नगरसेवकांवर सर्वाधीक प्रभाव असलेले माजी आमदार व भाजपचे माजी शहराध्यक्ष बाळासाहेब सानप आता शिवसेनेत गेले आहेत. भाजपच्या शहराध्यक्षांचा काहीही प्रभाव नाही. महापालिकेत भाजपला नियंत्रणात ठेवील असा एक नेता नाही. त्याऐवजी असंख्य गट असुन त्यांचे एकमेकांशी जमतच नाही. अशा स्थितीत माजी आमदार सानप यांनी 'मॅजीक' केली तर महापालिकेतही सत्तांतर होईल. भाजपची ही चिंता आहे. त्यामुळे सरकारोहणार मुंबईत आणि आनंदाच्या उकळ्या फुटताहेत नाशिकला असे चित्र आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com