सभा राज ठाकरेंची...चर्चेत आले उमेदवार दिलीप दातीर

विधानसभा निवडणुक प्रचारासाठी येथील डोंगरे वसतीगृहावर 'मनसे' प्रमुख राज ठाकरे यांची प्रचंड सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी जबरदस्त फटकेबाजी केली. मात्र, ठाकरे येण्या आधी येथे नाशिक पश्‍चिम मतदारसंघाचे उमेदवार दिलीप दातीर यांचे भाषण झाले. त्यात त्यांनी शहराचे प्रश्‍न तीव्रतेने माडंले. उपस्थितांचा टाळ्या, शीट्यांचा मोठा प्रतिसाद त्याला लाभला. त्यामुळे सभा झाली राज ठाकरेंची अन्‌ सोशल मिडीयावर चर्चा होते आहे उमेदवार दातीरांची अशी स्थिती आहे.
Dilip Datir - Raj Thakray
Dilip Datir - Raj Thakray

नाशिक : विधानसभा निवडणुक प्रचारासाठी येथील डोंगरे वसतीगृहावर 'मनसे' प्रमुख राज ठाकरे यांची प्रचंड सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी जबरदस्त फटकेबाजी केली. मात्र, ठाकरे येण्या आधी येथे नाशिक पश्‍चिम मतदारसंघाचे उमेदवार दिलीप दातीर यांचे भाषण झाले. त्यात त्यांनी शहराचे प्रश्‍न तीव्रतेने माडंले. उपस्थितांचा टाळ्या, शीट्यांचा मोठा प्रतिसाद त्याला लाभला. त्यामुळे सभा झाली राज ठाकरेंची अन्‌ सोशल मिडीयावर चर्चा होते आहे उमेदवार दातीरांची अशी स्थिती आहे.

शहरातील नितीन भोसले, सिध्दांत मंडाले आणि नगरसेवक दिलीप दातीर यांच्या प्रचारासाठी सभा झाली. राज ठाकरे आठला सभेच्या ठिकाणी पोहोचले. तत्पुर्वी माजी नगरसेवक दातीर यांचे भाषण झाले. यावेळी त्यांनी महापालिकेतील समस्या, अडचणी, गैरकारभारांवर ताषेरे ओढले. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे कामकाज आणि शहर दत्तक घेतल्या नंतर झालेली परवड यावर त्यांनी परखड भाषेत समाचार घेतला. त्याला विनोदाचीही जोड होती. हे सर्वच प्रश्‍न मतदारसंघ अन्‌ नागरीकांच्या जिव्हाळ्याचे होते. त्यामुळे अनेकांनी त्याचे रेकॉर्डींग केले. काहींनी फेसबुक लाईव्ह केले. तेव्हापासून सोशल मिडीयावर दातीर यांचे भाषण मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. 

शहरातील सर्वात गंभीर समस्या असलेला अंबड- लींक रोडवरील भंगार बाजार हलविण्यासाठी दातीर यांनी अनेक वर्षे पाटपुरावा केला त्यासाठी त्यांनी महापालिका, उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयापर्यंत संघर्ष केला. त्यामुळे सिडको, अंबड, सातपुर भागाला दिलासा मिळाला. या भागातील नागरीक त्याचे कौतुक करतात. मात्र, हा प्रश्‍न अद्याप सुटलेला नाही. हा बाजार वसु नये यासाठी त्यांना खंबीर, लढवय्या प्रतिनिधी हवा आहे. त्यादृष्टीने ते दातीर यांच्याकडे पाहतात. नागरीकांची ही दुखती नस दातीर यांनी आपल्या भाषणात पकडली. त्यामुळेच त्यांचे भाषण हातोहात व्हायरल झाले. लाईक्‍स मिळाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com