भुजबळांचा बोट क्लब राजकारणाच्या अडगळीत

काँग्रेस आघाडीच्या काळातील उपक्रम जाणीवपूर्वक दुर्लक्षीत ठेवले जातात. बोटींग क्लब, कलाग्राम अशा महत्वाच्या प्रकल्पांची हेळसांड सुरु आहे. -जयंत जाधव (आमदार)
भुजबळांचा बोट क्लब राजकारणाच्या अडगळीत

सत्तांतराने नाशिकचा चांगला प्रकल्प पाण्यात

नाशिक : काँआघाडीच्या काळात तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून सुरु झालेल्या आणि चित्रपट अभिनेते सलमान खान आणि सुनील शेट्टी यांच्याशिवाय कुठल्या नाशिककरांनी साधी चक्करही न मारलेल्या बोट क्‍लबवरील बोटी सडायला लागल्या आहेत. साडे तीन वर्षापासून तशाच पडून असलेल्या या बोटींच्या रुपाने सामान्यांच्या करच्या पैशाची कशी वाट लागते. याचे उत्तम उदाहरण गंगापूर धरणावरील बोटक्‍लब ठरावे.

काँग्रेस आघाडीच्या काळात तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून नाशिकला गंगापूर धरणावर बोट क्‍लबचा उपक्रमाचा श्रीगणेशा केला. पाटबंधारे पर्यटन विभागाच्या एकत्रित प्रयत्नातून बोटक्‍लब सुरु करण्याच्या या प्रयत्नात त्यावेळी 8 ते 9 विदेशी बोटी आणल्या गेल्या. अद्यावत स्वरुपाच्या या बोटींच्या उद्घाटनाला चित्रपट अभिनेते सलमान खान, सुनील शेट्टी आले. त्यांच्यासह मोजक्‍या पदाधिकाऱ्यांनी गंगापूर धरणाच्या पाण्यावर सैर करीत फोटोसेशन केले. नाशिक शहरातील तरुणाई गंगापूर धरणावर त्यांच्या चाहत्यांना पहायला जमली होती. मोठा गाजावाजा झालेल्या या प्रकल्पांच्या धामधुमीत शुभारंभ झाला. पाठोपाठ तेथे बोटक्‍लबची इमारत उभारली गेली. पण त्यानंतर साडे तीन वर्षात मात्र या अभिनेत्यांशिवाय कुठला नाशिककरही बोटीतून फिरला नाही.

लोकसभा निवडणूकात पाठोपाठ राज्यातील विधानसभा निवडणूकात सत्तांतर झाले. विविध चौकशीच्या फेऱ्यात श्भुजबळ तुरुंगात गेले. त्यामुळे त्यांच्या कल्पनेतील बोट क्लबची इमारत, विदेशी बोटी पडून राहिल्या. गेल्या तीन वर्षाहून आधिक काळापासून बोटी तशाच पडून आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन जळगावचे असल्याने तीन चार महिन्यातून एखादे वेळेस नाशिकला येतात. एखाद दुसरी बैठक आणि भाषण करुन निघून जातात. त्यामुळे कलाग्राम पासून तर बोटक्लब पर्यतचे विषय प्रलंबित प्रकल्प 'जैसे थे' आहेत. विदेशातून आणलेल्या अद्यावत बोटी सलग तीन वर्षापासून पडून राहिल्याने सामान्यांच्या पैशाची धूळधाण उडते आहे.

बोटी झाकून ठेवल्याचा दावा
बोट क्‍लबच्या बोटी या विदेशातील चांगल्या दर्जाच्या प्लॅस्टीक सदृश्‍य वस्तूपासून बनविलेल्या आहेत. त्या तेव्हापासून व्यवस्थित झाकून ठेवलेल्या असल्याने सडलेल्या नाहीत, असा दावा पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक नितीन मुंढावरे यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com