राष्ट्रवादीच्या बांगड्यांच्या भितीने भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे गायब? 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात शहरभर असभ्य भाषेत केलेल्या बॅनरबाजीने भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे काल चांगलेच चर्चेत आले. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांची प्रतिक्रीया येताच ते गायब देखील झाले. बांगड्या घेऊन शहाणेंचा सगळीकडे शोध घेऊनही ते सापडले नाहीत.
राष्ट्रवादीच्या बांगड्यांच्या भितीने भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे गायब? 

नाशिक : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात शहरभर असभ्य भाषेत केलेल्या बॅनरबाजीने भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे काल चांगलेच चर्चेत आले. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांची प्रतिक्रीया येताच ते गायब देखील झाले. बांगड्या घेऊन शहाणेंचा सगळीकडे शोध घेऊनही ते सापडले नाहीत. या संदर्भात पोलिसांना निवेदन देण्यात आल्याने शहाणे यांनी त्याचा चांगलाच धसका घेतल्याचे चित्र होते. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले. 

सिडकोतील महिला पदादिकारी नगरसेवक शहाणे यांन शोधण्यासाठी महापालिकेत गेल्या. ते सापडले नाही. त्यानंतर यांच्या संपर्क कार्यालयात गेल्या तिथेही ते नव्हते. त्यांचा फोनही स्वीचऑफ होता. शहाणे जेव्हा भेटतील तेव्हा त्यांना उत्तर दिले जाईल, असा इशारा देण्यात आला. चुकीचे वक्तव्य करणे, बॅनर जाळणे तसेच चुकीचा संदेश असलेला बॅनर अनधिकृतपणे वेगवेगळ्या ठिकाणी लावल्याप्रकरणी भाजप नगरसेवक मुकेश शहाणे यांचा संपर्क कार्यालयाबाहेर असलेल्या नामफलकावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बांगड्यांचा हार घालून निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सिडको अध्यक्ष विशाल डोके, शहर उपाध्यक्ष मुकेश शेवाळे, राहुल कमानकर, संतोष भुजबळ, आकाश कदम, पुष्पाताई राठोड, संगीता सानप, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

शहाणे यांनी अजित पवार यांच्या बदनामीप्रकरणी माफी मागावी आणि पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादीतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी शहाणे यांच्या छायाचित्राला काळे फासून जोडे मारत ते जाळण्यात आले. या आंदोलनात महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्षा अनिता भामरे, पुरुषोत्तम कडलग, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदन भास्करे आदी सहभागी झाले होते. 

दरम्यान शहाणे तसेच फलकाची छपाई करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे करण्यात आली. शहराध्यक्ष रंजन ठाकरे आणि शिष्टमंडळाने याबाबतचे निवेदन पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांना दिले. शिष्टमंडळात नानासाहेब महाले, माजी आमदार जयवंत जाधव, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, विष्णुपंत म्हैसधुणे, युवक अध्यक्ष अंबादास खैरे, गौरव गोवर्धने, मधुकर मौले, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष सलीम शेख आदी उपस्थित होते. यानिमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेस सक्रीय झाल्याचे चित्र दिसले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com