Nashik Political News Amol Kolhe Dialogue with College Students | Sarkarnama

युवकांनो आमदार, खासदारांना अडवून तुमच्या प्रश्नाची उत्तरे घ्या : अमोल कोल्हे (व्हिडिओ)

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

''आज खरे प्रश्न, युवक, विद्यार्थ्यांना भेडसावणारे विषय पडद्याआड करून भलत्या विषयाकडे सत्ताधारी लक्ष देतात. आपण त्यात अडकू नये. आमदार, खासदारांना आपण निवडतो. त्यांना अडवून आपल्या प्रश्नांची उत्तरे घ्या,'' असे खासदार अमोल कोल्हे यांनी विद्यार्थ्यांशी झालेल्या संवादात बोलनाना सांगितले.

निफाड  : ''आज खरे प्रश्न, युवक, विद्यार्थ्यांना भेडसावणारे विषय पडद्याआड करून भलत्या विषयाकडे सत्ताधारी लक्ष देतात. आपण त्यात अडकू नये. आमदार, खासदारांना आपण निवडतो. त्यांना अडवून आपल्या प्रश्नांची उत्तरे घ्या,'' असे खासदार अमोल कोल्हे यांनी विद्यार्थ्यांशी झालेल्या संवादात बोलनाना सांगितले.

निफाड राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवसवराज्य यात्रेनिमित्त खासदार अमोल कोल्हे यांनी निफाड येथील कर्मवीर गणपतराव मोरे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यां सोबत संवाद साधला अनेक विद्यार्थ्यांनी खासदर अमोल कोल्हे यांना मनमोकळे पणे प्रश्न विचारले. महाविद्यालयाची  मृणाल निमसे हिने खासदार कोल्हे तुम्ही संभाजी महाराज मालिकेतुन राजकारणात का आलात?, असे विचारले. यावर खासदार कोल्हे यांनी उत्तर देताना राजकारणात तुमच्या सारख्या युवकांच्या भविष्याचा विचार करून मी राजकारणात आलो आहे, असे सांगितले.

रोहिणी घोटेकर हिने विचारलेल्या महाराष्ट्रात होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांबाबत आपण काय करणार या प्रश्नाला उत्तर देताना कोल्हे म्हणाले की की माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या कर्जे माफी, हमी भाव यासाठी संसदेत वेळोवेळी आवाज उठवला आहे आणि या पुढे ही उठवत राहू. स्नेहल गोळे या विद्यार्थ्यांनीने रानवड व निफाड कारखाना चालू होण्यासाठी तुम्ही काय करू शकता असे विचारले असता कोल्हे म्हणाले की, हाच प्रश्न दहा वर्षात स्थानिक आमदारांना कधी विचारला का? तो विषय राज्याच्या अधिकारात आहे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अभीप्रेत असलेल्या महाराष्ट्र बनवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ला  साथ देण्याचे आवाहन खासदार कोल्हे यांनी संवाद साधताना युवकांना उद्देशून केले.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, युवक शाखेचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, संभाजी ब्रिगेडचे अमोल मेटकरी, माजी खासदार समीर भुजबळ, देवीदास पिंगळे, माजी आमदार दिलीप बनकर, श्रीराम शेटे, लक्ष्मण मंडाले, सिध्दार्थ वनारसे, सुरेश कमानकर आदी उपस्थित होते

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख