भुजबळ - राऊत यांच्यात काय कानगोष्टी झाल्या?

सध्या हंगाम निवडणुकांचा आहे. त्यामुळे दोन नेते एकत्र आले तरी त्याची चर्चा होते. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे फायरब्रँड नेते छगन भुजबळ आणि शिवसेना नेते संजय राऊत असतील तर...मग चर्चा तर होणारच.
भुजबळ - राऊत यांच्यात काय कानगोष्टी झाल्या?

नाशिक : सध्या हंगाम निवडणुकांचा आहे. त्यामुळे दोन नेते एकत्र आले तरी त्याची चर्चा होते. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे फायरब्रँड नेते छगन भुजबळ आणि शिवसेना नेते संजय राऊत असतील तर...मग चर्चा तर होणारच. काल एका समारंभात हे दोघे एकत्र होते. त्यांच्यात चर्चाही झाली. त्याचा तपशील मात्र कळला नाही. त्यामुळे "भुजबळ राऊतांशी पूरस्थिती विषयी बोलले असतील का? की आणखी कशाबद्दल?" अशी चर्चा आहे.

शिवसेनेचे नगरसेवक व माजी सभागृह नेते सुधाकर बडगुजर आणि नगरसेविका हर्षा बडगुजर यांचे चिरंजीव दीपक यांचा साखरपुडा होता. स्वतः बडगुजर नाशिक पश्चिम मतदारसंघातील शिवसेनेचे प्रमुख इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा समारंभ होता. अनेक नेते निमंत्रित होते. राजकीय क्षेत्रातील विविध कार्यकर्ते, नेत्यांनी गर्दी केली होती. यावेळी शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत उपस्थित होते. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ देखील उपस्थित होते. 

हे दोन्ही नेते पहिल्या रांगेत शेजारीच बसले होते. त्यांच्यात बराच वेळ गप्पा झाल्या. घरगुती समारंभ असल्याने दोन्ही नेत्यांना त्याविषयी कोणीही छेडले नाही. मात्र राजकीय नेते एकत्र आले. राज्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, भाजप अनेक दावा करीत आहेत. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ आणि राऊत यांच्यात व्यक्तिगत गप्पा झाल्या का? की त्यांनी राज्यातील पुरस्थितीवर चर्चा केली? की आणखी काही? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com