आमदार सीमा हिरे म्हणतात.....आम्ही शुध्द शाकाहारी, 'तिखट'चा आग्रह नको! 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात सध्या सगळेच नेते, पदाधिकाऱ्यांच्या मिसळ पार्ट्या रंगत आहेत. यात एक वेगळा प्रयोग म्हणून नाशिकचे ग्रामदैवत कालिका संस्थानतर्फे आमरस पार्टी झाली. यामध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार माणिकराव कोकाटेंसह भाजप, कॉंग्रेस यांसह विविध पक्षांचे आमदार, नेते सहभागी झाले. यावेळी आमरसाचा स्वाद घेता घेता 'तिखट' जेवणाची चर्चा रंगली. यावेळी भाजपच्या आमदार सीमा हिरे म्हणाल्या....आम्ही शुध्द शाकाहारी, 'तिखट' जेवणाची चर्चाही नको' त्यांच्या या उद्गगारानंतर उसळलेल्या हास्य कारंजाने वातावरण हलके झाले.
आमदार सीमा हिरे म्हणतात.....आम्ही शुध्द शाकाहारी, 'तिखट'चा आग्रह नको! 

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात सध्या सगळेच नेते, पदाधिकाऱ्यांच्या मिसळ पार्ट्या रंगत आहेत. यात एक वेगळा प्रयोग म्हणून नाशिकचे ग्रामदैवत कालिका संस्थानतर्फे आमरस पार्टी झाली. यामध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार माणिकराव कोकाटेंसह भाजप, कॉंग्रेस यांसह विविध पक्षांचे आमदार, नेते सहभागी झाले. यावेळी आमरसाचा स्वाद घेता घेता 'तिखट' जेवणाची चर्चा रंगली. यावेळी भाजपच्या आमदार सीमा हिरे म्हणाल्या....आम्ही शुध्द शाकाहारी, 'तिखट' जेवणाची चर्चाही नको' त्यांच्या या उद्गगारानंतर उसळलेल्या हास्य कारंजाने वातावरण हलके झाले. 

माजी नगरसेवक केशव उर्फ आण्णा पाटील यांनी विविध नेत्यांना निमंत्रीत करुन आमरसाचे जेवण ठेवले होते. त्याला विविध राजकीय पक्षांचे नेते व्यक्तीगत व राजकीय विचार दूर ठेऊन उत्साहाने सहभागी झाले. कालिका मंदिराच्या सभागृहात झालेल्या या भोजनाला भाजपचे बंडखोर, अपक्ष उमेदवार, माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी आमरसाऐवजी 'तिखट' जेवणाची पार्टी ठेवायला पाहिजे, तसे का करत नाही, असे संयोजकांना विचारले. त्याला त्यांच्या समवेत आलेल्यांनीही प्रतिसाद दिला. या तिखट जेवणाच्या चर्चेनंतर काय हवे, काय नको इथपर्यंत विषय लांबत गेला. यावेळी स्वामी समर्थ केंद्राशी संबंधीत असलेल्या आमदार सीमा हिरे यांनी त्यात हस्तक्षेप करीत "अहो ही चर्चा थांबवा. आम्ही शुध्द शाकाहारी आहोत. तिखटाचा आग्रह थांबवा.'' असे म्हटल्याने उपस्थितांत चांगलीच खसखस पिकली. 

कॉंग्रेसच्या आमदार निर्मला गावीत, भाजपच्या आमदार सीमा हिरे, आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार अनिल आहेर, डॉ. कैलास कमोद, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठनेते नाना महाले, नगरसेविका भाग्यश्री ढेमसे, प्रतिभा पवार, माजी नगरसेवक दत्ता पाटील, मामा ठाकरे, डॉ. सुभाष देवरे यांसह विविध नेते या आमरस पार्टीत सहभागी झाले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com