प्रचाराला आलेल्या 'मनसे' उमेदवार सिध्दांत मंडालेंपुढे महिला रडल्या!

सामान्यतः प्रचाराला गेलला उमेदवार मतांची याचना करतांना रडकुंडीला येतो. मात्र देवळाली मतदारसंघातील 'मनसे'चे उमेदवार सिध्दांत मंडाले यांना आज उलटाच अनुभव आला. सहकारातील मोठ्या नेत्यांचे गाव असलेल्या मुंगसरा येथे मतदार महिलांनी आपले प्रश्‍न सांगितले. आम्हाला गावातील प्रस्थापितांनी रस्ता देखील होऊ दिला नाही, हे सांगतांना या महिला धाय मोकलून रडल्या. त्यामुळे उमेदवारालाही गलबलून आले.
Women Cried Befor MNS Deolali Candidate Siddhant Mandale
Women Cried Befor MNS Deolali Candidate Siddhant Mandale

नाशिक : सामान्यतः प्रचाराला गेलला उमेदवार मतांची याचना करतांना रडकुंडीला येतो. मात्र देवळाली मतदारसंघातील 'मनसे'चे उमेदवार सिध्दांत मंडाले यांना आज उलटाच अनुभव आला. सहकारातील मोठ्या नेत्यांचे गाव असलेल्या मुंगसरा येथे मतदार महिलांनी आपले प्रश्‍न सांगितले. आम्हाला गावातील प्रस्थापितांनी रस्ता देखील होऊ दिला नाही, हे सांगतांना या महिला धाय मोकलून रडल्या. त्यामुळे उमेदवारालाही गलबलून आले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार व पदाधिकारी मुंगसरे गावात प्रचाराला गेले. यावेळी त्यांना भेटलेल्या महिलांना त्यांनी तरुण उमेदवाराला मतदान करा, असे आवाहन केले. यावेळी या महिला स्वतःहून पुढे येत त्यांनी गावातील व्यथा सांगितल्या. गावात खूप समस्या आहेत. कोणीही निवडून गेल्यावर पुन्हा येत नाही. स्थानिक नेत्यांना आम्ही चार वेळा निवडून दिले. मात्र, त्यांनी आमच्या घरी जाण्यासाठी रस्ता होऊ दिला नाही. आम्हाला सायकलसुध्दा जाणार नाही, एव्हढा बारीक रस्ता आहे. रात्री तर आम्हाला घराबाहेर पडण्याची सोय नसते. हे सांगतांना या महिला रडू लागल्या. उमेदवाराने त्यांना धीर देत निवडणुकीनंतर पुन्हा गावात येऊन हा प्रश्‍न सोडवू. तुम्हाला रस्ता करुन देऊ असे सांगीतले. यावेळी जमलेले कार्यकर्ते, नागरीक देखील या समस्या ऐकुण व्यथीत झाले.

यावेळी मतदारसंघाचे निरीक्षक अॅड. दिलीप केदार, भाऊनाना पगार, रामदास पवार, खंडेराम मेढे, रमेश खांडबहाले, सुनील गायधनी आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com