भाजपच्या देवयानी फरांदेना उमेदवारीसाठी वसंत गितेंच्या रुपाने प्रबळ स्पर्धक?

वसंत गिते यांचे शहराच्या राजकारणावर चांगली पकड आहे. ते मनसेमध्ये असताना मनसेचे सर्वाधीक ३७ नगरसेवक निवडून आले होते. महापालिकेवर मनसेचे झेंडा फडकला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी मनसेच्या पंचवीस नगरसेवकांनी विविध पक्षांत पक्षांतर्गत केले होते. सर्व राजकीय पक्षांत त्यांना मानणारा वर्ग आहे.
Nashik Mayor and other leaders present for Vasant Gite's Birhday
Nashik Mayor and other leaders present for Vasant Gite's Birhday

नाशिक  : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी महापौर वसंत गितेंचा वाढदिवसाच्या समारंभाला शेकडो नेते, कार्यकर्त्यांची गर्दी उसळली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे शक्तीप्रदर्शन होते हे उघड आहे. मात्र, गिते हे नाशिक मध्य मतदार संघातील इच्छुक आहेत. त्यामुळे या शक्तीप्रदर्शनाने भाजपच्या आमदार देवयानी फरांदेना उमेदवारीसाठी पक्षात प्रबळ दावेदार तयार झाल्याने उमेदवारी मिळवणे सोपे नाही हे स्पष्ट झाले.

वसंत गिते यांचे शहराच्या राजकारणावर चांगली पकड आहे. ते मनसेमध्ये असताना मनसेचे सर्वाधीक ३७ नगरसेवक निवडून आले होते. महापालिकेवर मनसेचे झेंडा फडकला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी मनसेच्या पंचवीस नगरसेवकांनी विविध पक्षांत पक्षांतर्गत केले होते. सर्व राजकीय पक्षांत त्यांना मानणारा वर्ग आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार देवीदास पिंगळे, महापौर रंजना भानसी,  उपमहापौर प्रथमेश गितें, आमदार सीमा हिरे, नानासाहेब सोनवणे, विजय साने, शिवसेना जिल्हा प्रमुख विजय करंजकर, शिवसेना नेते सुधाकर बडगुजर, कॅन्टोनमेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष सचिन ठाकरे यांसह सर्व पक्षी नेत्यांची मांदीयाळी होती. 

कार्यकर्ते, नागरिकांची शुभेच्छा देण्यासाठी झुंज उडाल्याने मुंबई नाका येथे झालेल्या कार्यक्रमामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळे भाजपमध्ये उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार तयार झाल्याचे लपून राहिलेले नाही. त्यामुळे विद्यमान आमदार देवयानी फरांदेना पक्षातच उमेदवारीसाठी झगडावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com