मालेगावात "सोशल डिस्टन्सिंग' दाखवा अन्‌ हजार रुपये मिळवा !

मालेगाव शहरात धारावीला लाजवेल एव्हढ्या दाट झोपड्या आहेत. येथील गल्लीच जर दोन फुटाची असेल तर सोशल डिस्टन्सींग अन्‌ होम क्वॉरंटाईन यशस्वी होणार तरी कसे?त्यामुळे अक्षरशः सोशल डिस्टन्सींग दाखवा अन्‌ हजार रुपये असे म्हणायची वेळ आली आहे.
Social Distancing Difficult in Malegaon Due to Various Reasons
Social Distancing Difficult in Malegaon Due to Various Reasons

मालेगाव : महाराष्ट्राचे 'मँचेस्टर' अशी बिरुदावली मिरवणारे मालेगाव. मात्र फक्त बिरुदच मॅचेस्टर, प्रत्यक्षात येथे धारावीला लाजवेल एव्हढ्या दाट झोपड्या आहेत. येथील गल्लीच जर दोन फुटाची असेल तर सोशल डिस्टन्सींग अन्‌ होम क्वॉरंटाईन होणार तरी कसे?. 'कोरोना'चे संकट आल्याने या प्रश्‍नाचे उत्तर प्रशासन, पोलिस, नेते अन्‌ येथील नागरीक देखील विचारत आहेत. त्यामुळे अक्षरशः सोशल डिस्टन्सींग दाखवा अन्‌ हजार रुपये मिळवा.... असे म्हणायची वेळ आली आहे.

मालेगाव शहरात सध्या छत्तीस कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. त्यात आज सकाळी प्राप्त अहवालानुसार चार जणांची वाढ झाली आहे. या शहर चोवीस तासांत नऊ रुग्णांची भर पडली आहे. मालेगावमध्ये 264 जण देखीरेखीखाली आहेत. विविध रुग्णालयांत 121 दाखल आहेत. 219 जणांचा स्त्राव तपासणीसाठी पाठवला आहे. 75 जणांचे अहवाल अप्राप्त आहेत. 119 जणांवर उपचार सुरु आहेत. येथे चाळीस पथके रात्रंदिवस सील केलेल्या भागाची तपासणी करुन रुग्णांचा शोध घेत आहेत. खास नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. 

एकूण स्थितीच भयानक

शहरात दहा दिवसांपासून संचारबंदी आहे. मात्र त्याचे पालन होत नाही. त्यामुळे दोन्ही पोलिस उपअधिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. रुग्णांना तातडीने दाखल केले जात नाही म्हणून महापालिका आयुक्तांना नोटीस देण्यात आली आहे. एकदंर प्रशासन अतिशय काळजीपूर्वक कार्यरत असले तरी क्वारंटाईन कुठे, किती जणांना व कसे करायचे हा गंभीर प्रश्‍न आहे. त्याची कारणे देखील तशीच आहेत. येथील नागरीक सहकार्य करीत नाहीत. परक्‍या कर्मचाऱ्याला अनेक भागांत सहज जाताही येत नाही.या शहरात नागरीक जिथे जागा दिसेल तिथे अतिक्रमण करतात. वर्दळीच्या रस्त्यांवर तुम्हाला पथदीप दिसेल मात्र खांब दिसणार नाही. कारण त्या खांबाभोवती पत्रा लावून अतिक्रमण केलेले असते. 

उष्णतेचीही समस्या

शहरात कोरोना बाधीतांमुळे सात कंटेनमेंट परिसर जाहिर केले आहेत. यामध्ये नयापुरा, गुलाबबाग वगळता कमालपुरा, मोमीनपुरा, महेवीनगर, मदीनाबाग, अपना सुपर मार्केट या पाच कंटेनमेंट परिसरात सोशल डिस्टन्सिंग शक्‍यच नाही अशी स्थिती आहे.या शहरात तापमान राज्यापेक्षा दोन अंश जास्तच असते. राज्यातील हे सर्वात उष्ण शहर आहे. त्यामुळ उन्हाळ्यात येथील हजारो लोक घोळक्‍या गोळक्‍याने चौकात, रस्त्यांवर जमतात. सर्व राजकारण, समाजकारण, गप्पा येथेच होते. 

मध्यरात्री तापमान खाली आले की लोक घरात जातात. येथे हजार खोली भाग आहे. तेथे नवखा व्यक्ती गेलात तर पुन्हा बाहेर कसे पडावे याचा गोंधळ होतो. रमजानपुरा, म्हाळदे या भागात एव्हढी दाटीवाटीने झोपड्या आहेत, की सायकल देखील उभी करता येत नाही. दोन फुटाची गल्ली. त्यात सोशल डिस्टन्सींग करणार कसे?. पाळणार कसे?.

त्यामुळे मालेगावला सोशल डिस्टन्सिंग झालेले दाखवा अन्‌ हजार रुपये बक्षीस मिळवा अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंग स्वतः सर्व सहकाऱ्यांसह मालेगावात रात्री रस्त्यावर संचलन करुन व्यवस्थेचा दबाव निर्माण करीत आहेत.
...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com