निर्मला गावितांच्या प्रवेश थांबविण्यासाठी इगतपुरीतील शिवसेना नेते मातोश्रीवर कैफीयत मांडणार !

आमदार गावित यांच्या प्रवेशाच्या बातमीनेअस्वस्थ झालेल्या तालुक्‍यातील शिवसेना कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर इगतपुरीतील पिंप्रीसदो येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी सायंकाळी पदाधिकारी आणि जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक झाली. यावेळी "आम्हाला आयात उमेदवार नको. शिवसेनेने बुथस्तरावर मोठी तयारी केली असल्याने यंदा शिवसेनेचा आमदार निश्‍चित होईल,'' असे स्पष्ट करण्यात आले
निर्मला गावितांच्या प्रवेश थांबविण्यासाठी इगतपुरीतील शिवसेना नेते मातोश्रीवर कैफीयत मांडणार !

इगतपुरी  : कॉंग्रेसच्या आमदार निर्मला गावित उद्या (ता.20) शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे स्थानिक शिवसेना पदाधिकारी, नेते आणि इच्छुकांत मोठी अस्वस्थता पसरली आहे. काल त्यांनी जिल्हा संपर्कप्रमुखांकडे बाजु मांडली. आज हे पदाधिकारी मुंबईला 'मातोश्री'कडे रवाना झाले. त्यामुळे गावितांचा शिवसेना प्रवेश झाल्यास स्थानिक इच्छुकांना नवा आश्रय शोधण्याची वेळ येईल अशी स्थिती आहे. 

आमदार गावित यांच्या प्रवेशाच्या बातमीने अस्वस्थ झालेल्या तालुक्‍यातील शिवसेना कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर इगतपुरीतील पिंप्रीसदो येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी सायंकाळी पदाधिकारी आणि जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक झाली. यावेळी "आम्हाला आयात उमेदवार नको. शिवसेनेने बुथस्तरावर मोठी तयारी केली असल्याने यंदा शिवसेनेचा आमदार निश्‍चित होईल,'' असे स्पष्ट करण्यात आले. या वेळी चौधरी यांनी सांगितले, की आमदार निर्मला गावित व बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी झालेली बैठक ही वैयक्तिक असून, गावित शिवसेनेत प्रवेश करणार असे काहीच बैठकीत ठरलेले नाही. त्यांची भेट फक्त वैयक्तिक होती. त्यामुळे वरिष्ठांच्या कानवर तुमची भूमिका मांडली जाईल, असे सांगीतले. यावेळी ठरल्याप्रमाणे आज यातील बहुतांश पदाधिकारी दुपारी मुंबईत वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेणार आहेत. 

बैठकीला इच्छुक उमेदवार काशीनाथ मेंगाळ, विधानसभा संपर्कप्रमुख जयंत साठे, इगतपुरी तालुकाप्रमुख भगवान आडोळे, त्र्यंबकेश्‍वर तालुकाप्रमुख रवी वारुंगसे, संपत चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य कावजी ठाकरे, तालुका उपप्रमुख रमेश धांडे, तालुका संघटक मनोहर महाले, त्र्यंबक तालुका उपप्रमुख समाधान बोडके, जिल्हाप्रमुख बाळा गव्हाणे, गटप्रमुख कुंडलिक जमधडे, दौलत बोंडे, अशोक सुरुडे, ज्ञानेश्‍वर जमधडे, लहू शिरसाट, जनार्दन कडू, जयराम गव्हाणे, किरण वारघडे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com