शिवाजी चुंभळे म्हणाले....पत्रकारांनो धावपळ कशाला करता, मीच तुम्हाला बाईट देतो!

बाजार समितीचे सभापती, शिवसेनेचे नेते शिवाजी चुंभळे कर्मचाऱ्याच्या नियुक्ती पत्रसाठी तीन लाखांची लाच घेताना ट्रॅपमध्ये सापडले. त्याना पोलिसांनी काल न्यायालयात आणले. तेव्हा ते अगदी निर्धास्त होते. यावेळी छायाचित्रकार, पत्रकारांची धावपळ झाली. तेव्हा अगदी बिनधास्तपणे चुंभळे म्हणाले, "एव्हढी धावपळ कशासाठी?. मीच तुम्हाला बाईट देतो. टेन्शन नका घेऊ''त्यानंतर काही वेळातच न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कठडी सुनावली.
 शिवाजी चुंभळे म्हणाले....पत्रकारांनो धावपळ कशाला करता, मीच तुम्हाला बाईट देतो!

नाशिक : बाजार समितीचे सभापती, शिवसेनेचे नेते शिवाजी चुंभळे कर्मचाऱ्याच्या नियुक्ती पत्रांसाठी तीन लाखांची लाच घेताना ट्रॅपमध्ये सापडले. त्याना पोलिसांनी काल न्यायालयात आणले. तेव्हा ते अगदी निर्धास्त होते. यावेळी छायाचित्रकार, पत्रकारांची धावपळ झाली. तेव्हा अगदी बिनधास्तपणे चुंभळे म्हणाले, "एव्हढी धावपळ कशासाठी?. मीच तुम्हाला बाईट देतो. टेन्शन नका घेऊ'' त्यानंतर काही वेळातच न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कठडी सुनावली. 

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कंत्राटी कर्मचाऱ्याकडून लाच स्वीकारताना अटक केलेल्या सभापती, शिवसेनेचे नेते शिवाजी चुंभळे यांना शनिवारी न्यायालयीन कोठडी देण्यात आली. जामीनावर निर्णय झाला नाही. त्यानंतर त्यांच्या छातीत दुखत असल्याचे सांगितल्याने त्यांचा मुक्काम कारागृहाऐवजी थेट जिल्हा रुग्णालयात झाला. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यांना पोलिस कोठडी हवी होती. मात्र न्यायलयाने ती नाकारली. त्यामुळे याप्रकरणी ते उच्च न्यायालयात जाणार आहेत, तर चुंभळे कुटुंबीय त्यांच्या जामिनासाठी प्रयत्नशील आहे. 

त्यांच्या न्यायालयीन कोठडीची माहिती समजताच न्यायालयाच्या आवारात असलेल्या समर्थकांनी तातडीने जामिनासाठीच्या कागदपत्रांसाठी धावाधाव केली. चुंभळे यांच्या वकिलांनी न्यायलयात जामीन अर्ज सादर केला. मात्र, त्यावर सरकारी वकिलांनी आक्षेप घेतला. सायंकाळी साडेपाचनंतर जामिनाची नोटीस मिळाल्याने त्यास स्थगिती देण्याचा अर्ज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयात सादर केला. पोलिस कोठडीचा हक्क मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात जाणार असल्याने स्थगिती कायम ठेवण्याची मागणी या वेळी करण्यात आली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com