नेमणुकीसाठी ३ लाखांची लाच घेणारे शिवसेना नेते शिवाजी चुंभळेंना जामीन 

बाजार समितीचे सभापती, शिवसेनेचे नेते शिवाजी चुंभळे यांनी कर्मचाऱ्याच्या नियुक्ती पत्रसाठी तीन लाखांची लाच घेताना ट्रॅपमध्ये सापडले होते. त्याना आज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. कुलकर्णी यांनी जामीन मंजुर केला.
नेमणुकीसाठी ३ लाखांची लाच घेणारे शिवसेना नेते शिवाजी चुंभळेंना जामीन 

नाशिक : बाजार समितीचे सभापती, शिवसेनेचे नेते शिवाजी चुंभळे यांनी कर्मचाऱ्याच्या नियुक्ती पत्रसाठी तीन लाखांची लाच घेताना ट्रॅपमध्ये सापडले होते. त्याना आज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. कुलकर्णी यांनी जामीन मंजुर केला. 

चुंभळे यांच्या वतीने अॅड अविनाश भिडे, अॅड एम. वाय काळे, अॅड राहुल कासलीवाल, अॅड राजेश आव्हाड यांनी बाजू मांडली.  सरकारी वकील अजय मिसर यांनी लाचलुचपत विभागाच्या वतीने जामीनाला विरोध केला. मात्र, न्यायालयाने चुंभळे यांना पन्नास हजारांच्या जातमुतचलक्‍यावर जामीन मंजूर केला. पुढील दोन महिने त्यांना दर बुधवारी आणि गुरुवारी दुपारी अकरा ते दोन या वेळेत त्यांना लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात हजेरी द्यावी लागणार आहे. चुंभळे यांना जामीन मंजुर केल्याने त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने त्यांचे समर्थकांनी न्यायालयाच्या आवारात गर्दी केली होती. 

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कंत्राटी कर्मचाऱ्याकडून लाच स्वीकारताना अटक केलेल्या सभापती, शिवसेनेचे नेते शिवाजी चुंभळे यांना शनिवारी येत्या ३० आॅगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी दिली होती. जामीनावर निर्णय झाला नव्हता. त्यानंतर त्यांच्या छातीत दुखत असल्याचे सांगितल्याने त्यांचा मुक्काम कारागृहाऐवजी थेट जिल्हा रुग्णालयात झाला. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यांना पोलिस कोठडी हवी होती. मात्र, न्यायलयाने ती नाकारली होती. त्यामुळे या प्रकरणी ते उच्च न्यायालयात जाणार आहे, तर चुंभळे कुटुंबीय त्यांच्या जामिनासाठी प्रयत्नशील होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com