उदयनराजेंना जरा उशीराच समज आली : शरद पवारांचा टोला

उदयनराजे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील कालावधीची वर्षे वाया गेली असे वक्तव्य केले आहे. त्याविषयी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज निश्‍कीलपणे उत्तर दिले. ते म्हणाले, ''उदयनराजे पंधरा वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात होते. आपली ही सर्व वर्षे वाया गेल्याचे त्यांना पंधरा वर्षांनी समजले. हे समजण्यास त्यांना एव्हढी वर्षे लागली. याचा अर्थ त्यांना जरा उशीराच समज आली.''
Udayanraje - Sharad Pawar
Udayanraje - Sharad Pawar

नाशिक, उदयनराजे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील कालावधीची वर्षे वाया गेली असे वक्तव्य केले आहे. त्याविषयी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज निश्‍कीलपणे उत्तर दिले. ते म्हणाले, ''उदयनराजे पंधरा वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात होते. आपली ही सर्व वर्षे वाया गेल्याचे त्यांना पंधरा वर्षांनी समजले. हे समजण्यास त्यांना एव्हढी वर्षे लागली. याचा अर्थ त्यांना जरा उशीराच समज आली.''

पवार यांनी आजपासून विधानसभा निवडणूकीचा दौरा सुरु केला आहे. त्यासाठी त्यांनी आज पक्ष कार्यालयात मतदारसंघ निहाय इच्छुक उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी राजकीय स्थिती विषयी चर्चा केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, ''भाजपमध्ये गेल्यावर उदयनराजेंचा स्वभाव बदलेल की नाही? याचे उत्तर मी देऊ शकत नाही. कारण आता तो त्या पक्षाच्या लोकांचा प्रश्‍न आहे. मात्र, माझ्याकडे लोकांनी व्यक्‍त केलेल्या भावना वेगळ्या आहेत. ते सर्वच म्हणतात आमच्या मनात तुमच्याविषयी आदर आहे.''

यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, ''सध्या अनेक सहकारी पक्ष सोडून जात आहेत. त्यांची प्रत्येकाची विविध कारणे त्यांनी दिली आहेत. यातील बहुतांश सदस्यांनी मला विविध कागदपत्रे दाखवली. त्यात त्यांच्या संस्थांची चौकशी, विविध नोटीसा, सीबीआय, इडी या संस्थांकडून चौकशीची पत्र होती. त्याचे पुढे काय होईल हे मला सांगता येणार नाही. त्यात केवळ तक्रार केली म्हणून काढण्यात आलेल्या नोटीसही होत्या. त्या तक्रारीत तत्थ्य आहे अथवा नाही याची शहनिशा केलेली दिसत नाही. मात्र, केंद्रात, राज्यात एका पक्षाची सत्ता आहे. त्यांच्याकडून गृह, अर्थ व अन्य खात्यांच्या आयुधांचा वापर राजकीय पक्षांच्या प्रवेशासाठी यापूर्वी कधी झाला नव्हता. तो सध्या सुरु असल्याचे दिसते.''

सध्या भाजप, शिवसेनेत मेगा भरती सुरु आहे. त्याचा काय परिणाम होईल या प्रश्‍नावर ते म्हणाले, ''हे पहिल्यांदा झालेले नाही. यापूर्वी 1957 च्या निवडणूकीनंतरच्या कालावधीत असे झाले होते. 1962 च्या निवडणूकीपूर्वी राज्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा कालावधी होता. त्यानंतर तो प्रश्‍न शिल्लक राहिला नाही. राज्यात कॉंग्रेसचे सरकार आले. तेव्हा अनेक पक्षांची मंडळी कॉंग्रेसमध्ये दाखळ झाली होती. त्यामुळे हे नवीन आहे असे नाही. जनतेला ते रुचेलच असे नाही. सध्याचे चित्र तर लोकांना अजिबात रुचलेले दिसत नाही. त्यामुळे निवडणुकीनंतर चित्र वेगळे दिसेल.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com