भावाचे औक्षण सोडून उपनिरीक्षक छाया देवरेंनी महिलेला  छेडणा-याच्या मुसक्या आवळल्या

सर्वत्र रक्षाबंधनाचा कार्यक्रमाची धामधूम सुरू होती. पोलिसांच्या निर्भया पथकाच्या उपनिरीक्षक छाया देवरे भावाचे औक्षण करत होत्या. तेव्हढ्यात त्यांचा भ्रमणध्वनी खणखणला. त्यांनी घरचे रक्षाबंधण बाजुला सारले. संकटात सापडलेल्या एका भगीनीच्या मदतीला लावल्या. महिलेला त्रस्त करणा-या रोड रोमिओच्या मुसक्या आवळल्या.
भावाचे औक्षण सोडून उपनिरीक्षक छाया देवरेंनी महिलेला  छेडणा-याच्या मुसक्या आवळल्या

नाशिक : सर्वत्र रक्षाबंधनाचा कार्यक्रमाची धामधूम सुरू होती. पोलिसांच्या निर्भया पथकाच्या उपनिरीक्षक छाया देवरे भावाचे औक्षण करत होत्या. तेव्हढ्यात त्यांचा भ्रमणध्वनी खणखणला. त्यांनी घरचे रक्षाबंधण बाजुला सारले. संकटात सापडलेल्या एका भगीनीच्या मदतीला लावल्या. महिलेला त्रस्त करणा-या रोड रोमिओच्या मुसक्या आवळल्या.

राखी पौर्णिमेचा सण म्हणजे भाऊ- बहिणीचा पारंपरिक सण. मात्र विकृतांना त्याचेही भान नसते. अशांना शहरात पोलिसांच्या निर्भया पथकाच्या धडक कारवाईने योग्य जागा दाखविण्याचा काम होते आहे. आज सकाळी निर्भया शतकातील पोलिस उपनिरीक्षक छाया देवरे त्यांच्या घरी परगावहून खास सणासाठी आलेल्या भावाला राखी बांधत होत्या. याचवेळी एका अन्यायग्रस्त महिला बघिणीचा भ्रमणध्वनी आला. तिची फिर्याद व मदतीची विनंती एकुण त्यांनी घरचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम अर्ध्यावर सोडत छेडछाडीने त्रास देणा-या महिलेच्या मदतीला धावून जाणे त्यांनी पसंत केले.  

त्या तातडीने सहका-यासह घटनास्थळी गेल्या आणि महिलेला त्रास देणा-या  सडका सख्याहरीला ताब्यात घेतले.  'त्या' बहिणींची रक्षा केल्याने निर्भया पथकातील पोलिस उपनिरीक्षक  छाया देवरे यांचे महिला वर्गाकडून कौतुक होत आहे. सिडकोतील महापालिका घरकुल योजनेत हा प्रकार घडला होता. तेथील  घरकुल योजनेतील महिला व नागरिकांनीही त्यांना सहकार्य केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com