निवडणुकी आधीच रंगले नाशिकमध्ये फ्लेक्सचे महाभारत

विधानसभा निवडणुका जवळ आल्याने शहरातील, काटशहाचे राजकारण रंगले आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून एका शिक्षणसंस्थेशी संबंधित नेते संभाव्य उमेदवार आहेत,त्यांचा प्रचार घराघरात पोहोचला. भाजप, शिवसेनेचे इच्छुकांचेही जनसंपर्क दौरे जोरात आहेत. या प्रकाराचा धसका घेऊन विरोधकांनी चक्क या उमेदवारांचे नाव न घेता काही शिक्षकांच्या नावासह आक्षेप घेणारे फ्लेक्स लावल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.
निवडणुकी आधीच रंगले नाशिकमध्ये फ्लेक्सचे महाभारत

नााशिक  : विधानसभा निवडणुका जवळ आल्याने शहरातील, काटशहाचे राजकारण रंगले आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून एका शिक्षणसंस्थेशी संबंधित नेते संभाव्य उमेदवार आहेत, त्यांचा प्रचार घराघरात पोहोचला. भाजप, शिवसेनेचे इच्छुकांचेही जनसंपर्क दौरे जोरात आहेत. या प्रकाराचा धसका घेऊन विरोधकांनी चक्क या उमेदवारांचे नाव न घेता काही शिक्षकांच्या नावासह आक्षेप घेणारे फ्लेक्स लावल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.

या फ्लेक्सवर एकाच संस्थेच्या सतरा जणांची नावे व छायाचित्रे आहेत. ही मंडळी शैक्षणिक  कामे सोडून ही मंडळी प्रचार करीत आहे असा आक्षेप घेत त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्याबाबत नागरिकांनी निवडणूक आयोग अथवा पोलिसांना कळवावे, असे आवाहन केले आहे. फलक कोणी लावला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, याविषयी तक्रार करण्यास कोणीही पुढे आलेले नाही. त्यामुळे फ्लेक्स लावणारे कोण?  त्यात उल्लेख केलेले लोक खरेच प्रचार करतात काय? की ही नावेही काल्पनिक अशी चर्चा पसरली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com