पक्षांतरानंतर पराभवाने गावित बंधु-भगिनींपुढे राजकीय अस्तित्वाचा पेच

माणिकराव गावित हे नाव सलग नऊ वेळा खासदार आणि कॉंग्रेस श्रेष्ठींच्या गुडबुक मध्ये असल्याने त्यांचे नाव आदबीने घेतले जाते. मात्र राजकारणाच्या मावळतीला त्यांचा मुलगा भरत गावित यांनी भाजप तर कन्या आमदार निर्मला गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी पक्षांतर करु नये यासाठी अनेकांनी त्यांचे मन वळविले. मात्र, सर्व निष्फळ ठरले. विधानसभा निवडणुकीत दोघांचाही दारुण पराभव झाला. त्यामुळे आता त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.
Bharat Gavit - Nirmala Gavit
Bharat Gavit - Nirmala Gavit

इगतपुरी : माणिकराव गावित हे नाव सलग नऊ वेळा खासदार आणि कॉंग्रेस श्रेष्ठींच्या गुडबुक मध्ये असल्याने त्यांचे नाव आदबीने घेतले जाते. मात्र राजकारणाच्या मावळतीला त्यांचा मुलगा भरत गावित यांनी भाजप तर कन्या आमदार निर्मला गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी पक्षांतर करु नये यासाठी अनेकांनी त्यांचे मन वळविले. मात्र, सर्व निष्फळ ठरले. विधानसभा निवडणुकीत दोघांचाही दारुण पराभव झाला. त्यामुळे आता त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काही महिने आधी भारत गावित यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. कॉंग्रेसचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांसह विविध पदे त्यांना कॉंग्रेसमध्ये मिळाली. मात्र पक्ष अडचणीत असतांना लोकसभा निवडणुकीतच त्यांनी भाजपची वाट धरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना रोखले. मात्र निकालानंतर त्यांनी भाजप प्रवेश केलाचय राजकारणाचे बदलते वारे लक्षात घेऊन त्यांचा हो प्रवेश होता. विधानसभा निवडणुकीत नवापुर मतदारसंघातून त्यांनी भाजपची उमेदवारी केली. त्यात ते तिसऱ्या क्रमांकावर गेले. कॉंग्रेसचे शिरीष कुमार नाईक 72,167 मते मिळवुन विजयी झाले. अपक्ष शरद गावित 62,015 मते मिळवुन दुसऱ्या स्थानावर राहिले. भारत गावित यांना तिसऱ्या क्रमांकाची 57,434 मते मिळाली.

इगतपुरीच्या सलग दोन वेळा आमदार राहिलेल्या कॉंग्रेसच्या निर्मला गावित यांचा तिसऱ्यांदा विजय निश्‍चित मानला जात होता. त्यांच्या पक्षांतराची चर्चा सुरु झाल्यावर मतदारसंघातील मराठा समाजाच्या नेत्यांनी त्यांना पक्षांतर करु नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत असे सांगीतले. त्यानंतर पक्षांतराची चर्चा थांबली. त्यांनी कॉंग्रेसकडे मुलाखत दिली. त्यानंतरच्या आठवड्यात पती कार्यकारी अभियंता रमेश गावित आणि अन्य सल्लागारांनी त्यांना पक्षांतरासाठी दबाव आणल्याचे बोलले जाते. त्यांनी अनिच्छेनेच शिवबंधन बांधले. हे लोकांनाच नव्हे तर शिवसेनेतील इच्छुकांनाही पंसत पडले नाही. 

या निवडणुकीत त्यांच्या विरोधात सर्व स्थानिकांनी त्यांच्यामुळे स्थानिकांचे राजकारण संपेल हा भावनिक प्रचार केला. संदीप गुळवे, संपत सकाळे या कॉंग्रेसनीष्ठांनी ही निवडणुक प्रतिष्ठेची केली. त्यात कॉंग्रेसचे हिरामण खोसकर यांनी 86,061 मते मिळवून निर्मला गावित यांचा 31,555 मतांनी दणदणीत पराभव केला. या दोन्ही पराभवांनी धावत्याच्या पाठी लागून पक्षांतर केलेल्या निर्मला गावित आणि भारत गावित दोघांच्याही राजकीय भवितव्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

गंमत म्हणजे निर्मला गावित ज्या नेत्यांना घेऊन प्रचारात फिरल्या त्यातील काही अपवाद वगळता शिवसेनेच्या नेत्यांच्या गावातच त्यांना नगण्य मते मिळाली. त्र्यंबकेश्‍वर नगरपालिकेत भाजपची सत्ता आहे तीथे गावित यांना 2,447 तर कॉंग्रेसचे खोसकर यांना 3,973 मते मिळाली. शिवसेनेचे माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्या भावली गावात त्यांना 257 तर विरोधात 339, माजी आमदार शिवराम झोले यांच्या शेनवड गावात त्यांना अवघी 59 तर विरोधात 283, त्यांची कन्या नयना गावित जिल्हा परिषद सदस्य असलेल्या वाडीवऱ्हे गावात गावित यांना 756 तर विरोधात 1,531 मते आहेत. जवळ जवळ सगळीकडेच ही स्थिती राहिल्याने पक्षांतर ही त्यांची राजकीय चूक ठरल्याचा संदेश गेला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com