निर्मला गावित बचावासाठी शिवसेनेत; उमेदवारीवर हक्क निष्ठावंताचाच : काशिनाथ मेंगाळ

आमदार निर्मला गावित या स्वतःच्या बचावासाठी शिवसेनेत आल्या आहेत. शिवसेनेत सगळ्यांचेच स्वागत आहे. मात्र, पक्षात आल्याने उमेदवारी मिळत नसते. उमेदवारीसाठी निष्ठेचा विचार होतो. आम्ही सर्व शिवसेना कार्यकर्ते गेली तीन वर्षे संघटीतपणे मतदारसंघात निवडणुकीची तयारी करीत आहोत. पक्ष आमच्यासोबत आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी माझाच विचार होईल
निर्मला गावित बचावासाठी शिवसेनेत; उमेदवारीवर हक्क निष्ठावंताचाच : काशिनाथ मेंगाळ

इगतपुरी : ''आमदार निर्मला गावित या स्वतःच्या बचावासाठी शिवसेनेत आल्या आहेत. शिवसेनेत सगळ्यांचेच स्वागत आहे. मात्र, पक्षात आल्याने उमेदवारी मिळत नसते. उमेदवारीसाठी निष्ठेचा विचार होतो. आम्ही सर्व शिवसेना कार्यकर्ते गेली तीन वर्षे संघटीतपणे मतदारसंघात निवडणुकीची तयारी करीत आहोत. पक्ष आमच्यासोबत आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी माझाच विचार होईल. इगतपुरीत यंदा शिवसेनेचाच आमदार होईल," असा दावा शिवसेना नेते आणि माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी येथे केला. 

मेंगाळ शिवसनेचे संभाव्य उमेदवार म्हणून गेले काही वर्षे मतदारसंघात कार्यरत आहेत. आज कॉंग्रेसचा व आमदार पदाचा राजीनामा देऊन निर्मला गावित यांनी मुंबईत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या पार्श्‍वभूमीवर ते म्हणाले, "शिवसेनेचे संपर्कप्रमुख, स्थानिक व वरिष्ठ नेत्यांशी माझा संपर्क आहे. तालुक्‍यातील सर्व पदाधिकारी, भाजपचे दोन माजी आमदार यांच्या समवेत आम्ही सर्वानुमते पक्ष देईल त्या उमेदवाराला विजयी करु असा शब्द दिला आहे. नुकतीच नाशिकला संपर्क प्रमुखांसमवेत सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्यातही या विषयावर चर्चा झाली. त्यानंतरच्या राजकीय घडामोडींत आमदार गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला. हा प्रवेश मतदारसघाच्या विकासासाठी नव्हे तर त्यांच्या वैयक्तीक बचावासाठी आहे. त्यामुळे आम्ही सर्व निष्ठावंत शिवसेना कार्यकर्ते निश्‍चिंत आहोत. आम्ही शिवसेनेतच आहोत व शिवसेनेतच राहू." पक्ष उमेदवारी देतांना निष्ठेचा विचार करतो. प्रवेश सोहळ्यानंतर झालेल्या वार्तालापात वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारीच्या प्रश्‍नावर प्रतिक्रीया दिलेली नाही, हे सुचक आहे असेही त्यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com