काँग्रेस आमदार निर्मला गावित २० आॅगस्टला शिवबंधन बांधणार?

आमदार निर्मला गावित यांनी आजही शिवसेना प्रवेशाबाबत तोंडावर बोट कायम ठेवले. आपण पुणे येथे कौटुंबिक कार्यक्रमासाठी आलो आहोत. मी उद्या नाशिकला परतेन, त्यानंतर याबाबतचा काय निर्णय झाला याची माहिती घेईन. नाशिकला काय झाले याबाबत आपल्याला माहिती नाही, असे त्यांनी सांगितले.
काँग्रेस आमदार निर्मला गावित २० आॅगस्टला शिवबंधन बांधणार?

इगतपुरी : काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित येत्या मंगळवारी (ता.20) शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आज त्यांच्या अनुपस्थितीत कार्यकर्ते व पदाधिका-यांच्या झालेल्या बैठकीत देण्यात आली. यावेळी इगतपुरी तालुक्याच्या हिताचा विचार करुन आमदार गावित जो निर्णय घेतील त्याला पूर्ण सहमती राहील, असा ठराव कार्यकर्त्यांनी हात वर करुन केला. 

दरम्यान आमदार गावित यांनी आजही शिवसेना प्रवेशाबाबत तोंडावर बोट कायम ठेवले. आपण पुणे येथे कौटुंबिक कार्यक्रमासाठी आलो आहोत. मी उद्या नाशिकला परतेन, त्यानंतर याबाबतचा काय निर्णय झाला याची माहिती घेईन. नाशिकला काय झाले याबाबत आपल्याला माहिती नाही, असे त्यांनी सांगितले. 

आज दुपारी एकला आमदार गावित यांच्या नाशिक येथील निवासस्थानी तालुक्यातील कार्यकर्ते, पदाधिका-यांची बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा नयना गावित, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कचरु पाटील डुकरे, सरचिटणीस रमेश देवगिरे, कचरु पाटील शिंदे, बाळासाहेब कुकडे, सोमनात शिंदे, बाळु पाटील कुटके, पांडुरंग शिंदे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी होते. आमदार गावित यांच्या उपस्थितीत ही बैठक होती. मात्र त्या परगावी असल्याने उपस्थित राहू शकत नाहीत, त्यामुळे बैठक रद्द करण्याऐवजी तालुक्याच्या हिताच्या दृष्टीने त्या जो निर्णय घेतील, त्याला सहमती दर्शविण्यात आली. याबाबत सर्व अधिकार आमदार गावित यांना देण्याचा निर्णय झाला. यावेळी काही पदाधिका-यांनी येत्या मंगळवारी मुंबईत मातोश्री येथे आमदार गावित या सहका-यांसह शिवसेनेत प्रवेश करतील, असे निश्चित असल्याचे सांगण्यात आले. 

दरम्यान इगतपुरी तालुक्यातील काँग्रेसचे बहुतांश पदाधिकारी शिवसेनेत जाणार आहेत. मात्र त्र्यंबकेश्वर व हरसुल भागातील कार्यकर्ते या बैठकीस नव्हते. त्यामुळे शिवसेना प्रवेशाबाबत मतदारसंघात जोर- बैठकांना वेग आला. दुपारी हरसुल येथे बैठक घेण्यात आली. येत्या दोन दिवसांत पुन्हा बैठक घेतली जाईल. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ज्येष्ठांनी मात्र शिवसेनेच्या संस्कृतीचा विचार करता स्थानिक पदाधिकारी आपला कधीही स्वीकार करणार नाहीत. त्यामुळे सावधगिरीने विचार करावा असे सांगत शिवसेना प्रवेशापासून लांब राहणे पसंत केल्याचे कळते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com