राष्ट्रवादी काँग्रेसच्या भारती पवारांच्या रौद्र रुपाने शिक्षकांचा थरकाप

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व जिल्हा परिषद सदस्या भारती पवार एका समारंभासाठी आल्या होत्या. यावेळी समारंभ आटोपल्यावर त्यांनी थेट गावातील शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी अगदी प्रत्येक बारीक सारीक गोष्टींची तपासणी करीत शिक्षकांना चांगलेच फैलावर घेतले. त्यांच्या या तपासणीने शाळेच्या कर्मचा-यांची पाचावर धारण बसली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या भारती पवारांच्या रौद्र रुपाने शिक्षकांचा थरकाप

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व जिल्हा परिषद सदस्या भारती पवार एका समारंभासाठी आल्या होत्या. यावेळी समारंभ आटोपल्यावर त्यांनी थेट गावातील शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी अगदी प्रत्येक बारीक सारीक गोष्टींची तपासणी करीत शिक्षकांना चांगलेच फैलावर घेतले. त्यांच्या या तपासणीने शाळेच्या कर्मचा-यांची पाचावर धारण बसली. त्यांच्या समवेत असलेल्या शिक्षण सभापतींनी तेथून काढता पाय घेतला. त्यामुळे ग्रामस्थांनी मात्र भारती पवार यांच्या धडाकेबाज भूमिकेचे कौतुक केले.

पदाधिकारी म्हटले की, त्यांच्या सरकारी कार्यालये, शाळा या ठिकाणी भेटी.... तेथे होणारे मान-सन्मान यावर समाधानी होणारे राजकीय पुढारी अनेकदा पहायला मिळतात. पण जिल्हा परिषद सदस्या डॉ.भरती पवार यांनी धोंडगव्हाण शाळा, आंगणवाड़ीला अचानक भेट दिली. त्या विकासकामांच्या शुभारंभाच्या निमित्त आल्या होत्या.

सौ.पवार यांनी समारंभ अटोपल्यावर आपला मोर्चा जिल्हा परिषदेच्या शाळेकडे वळवला त्यांनी शाळेत असलेल्या नोंदवह्या, रजिस्टरची कसुन चौकशी केली. तब्बल दोन तास त्यांनी शिक्षकांना फैलावर घेतले. हे चित्र पाहून जिल्हा परिषदेचे शिक्षण आरोग्य सभापती यतिन पगार यांनी काही क्षणातच काढता पाय घेतला. पोषण आहार, गणवेश वाटप, हजेरी, शाळेच्या गरजा असे अनेक रजिस्टर त्यांनी अत्यंत अभ्यासू दृष्टीने पाहिले. एक महिला पदाधिकारी अशा प्रकारे तपासणी करू शकेल, अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. गावात त्यांच्या कामाची दोन दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु आहे. काहींनी तर त्यांना भावी खासदार म्हणून शुभेच्छा देखील दिल्या.

ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यांना घेवून त्यांनी ही तपासणी केली. त्यामुळे या महिलांना देखील आपल्याला असलेल्या अधिकाराची जाणीव झाली. या महिलांसोबत सेल्फ़ी काढायला सुद्धा त्या विसरल्या नाही. त्यांनी मुख्याध्यापक, शिक्षक, आंगणवाडी सेविका यांना अनेक सल्ले देवून सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली. राजकारणात नवखे पण नशीबवान असलेले चांदवड पंचायत समिति उपसभापति अमोल भालेराव यांनी सौ. पवार यांची ''ताई तुमच्यामुळे आज खुप शिकायला मिळाले,'' अशी स्तुति केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com