Sandip Deshpande - Chandrakant Patil
Sandip Deshpande - Chandrakant Patil

मंगल प्रभात लोढांनी चार मिल कुठुन घेतल्या सांगा? : मनसेच्या संदीप देशपांडेंचा सवाल

भाजप स्वतःला वॉशिग मशीन समजतो आहे. इतरांकडे बोट दाखवत त्यांचे नेते धमक्‍या देत आहेत. कोणीही त्यांच्या पक्षात जात आहे. यांच्या पक्षातील पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्याचा आरोप आहे. त्याची चौकशी झालेली नाही. विनोद तावडेंच्या गैरव्यवहाराची चौकशी होत नाही. विजयकुमार गावित यांच्यावर किती मोठा आरोप आहे. आदिवासी महामंडळातील मोठ्या भ्रष्टाचाराचा त्यांच्यावर आरोप आहे. त्याची अद्याप चौकशी नाही - संदीप देशपांडे

नाशिक : भारतीय जनता पक्ष स्वतःला 'वॉशिंग मशीन समजतो काय?' चंद्रकांत पाटील विचारतात कोहिनूर मिलसाठी पैसे कुठुन आले? अहो मग मंगल प्रभात लोढा यांनी चार मिल घेतल्या. त्यांनाही विचारा ना पैसे कुठून आणले." असा सवाल मनसे नेत संदीप देशपांडे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना उद्देशून केला. भाजपचे दोनशे नेते भ्रष्ट आहेत. त्यांची चौकशी का पुढे सरकत नाही. आम्हालाही सर्व काढता येते, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.  

मनसेच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी सद्य राजकीय स्थिती याविषयी चर्चा व भूमिका ऐकण्यासाठी आज ते येथे आले होते. यावेळी मनसेचे अभिजित पानसे आणि संदीप देशपांडे यांनी पदाधिकाऱ्यांशी व्यक्तीशः चर्चा केली. यावेळी 'सरकारनामा'शी बोलतांना, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे 'चंपा' असे उपरोधीक नाव घेऊन ते म्हणाले, ''चंपा म्हणतात मिल घ्यायला पैसे कुठुन आले? त्यांना एव्हढीच माहिती हवी असेल तर भाजपचे मंगल प्रभात लोढा यांनी मुंबईतील चार मिल्स खरेदी केल्या आहेत. त्यांच्याकडे पैसे कुठुन आले हे त्यांना विचारावे. राज ठाकरेंना 'इडी'च्या चौकशीची भिती दाखवू नये. ते अशाला घाबरणारे नाहीत. त्यांनी काही गैर केलेच नाही. त्यामुळे ते त्यातुन पूर्णतः निर्दोषच ठरतील.''

ते पुढे म्हणाले, ''हा पक्ष स्वतःला वॉशिग मशीन समजतो आहे. इतरांकडे बोट दाखवत त्यांचे नेते धमक्‍या देत आहेत. कोणीही त्यांच्या पक्षात जात आहे. यांच्या पक्षातील पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्याचा आरोप आहे. त्याची चौकशी झालेली नाही. विनोद तावडेंच्या गैरव्यवहाराची चौकशी होत नाही. विजयकुमार गावित यांच्यावर किती मोठा आरोप आहे. आदिवासी महामंडळातील मोठ्या भ्रष्टाचाराचा त्यांच्यावर आरोप आहे. त्याची अद्याप चौकशी नाही. त्यांचे दोनशे नेते भ्रष्ट आहेत. आम्हालाही माहिती काढता येते हे त्यांनी लक्षात ठेवावे. मनसे आणि राज ठाकरे यांच्या वाटेला जाण्याचे धाडस करु नये हेच त्यांच्यासाठी बरे होईल." 

मंगल प्रभात लोढा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com