कायदा हातात घेवू नका; कारवाईला आमंत्रण देवू नका : कृषीमंत्री दादा भुसेंचे आवाहन

कोरोना विषाणूशी लढा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, रुग्णालयातील स्वच्छतेवर लक्ष देण्यात यावे, रुग्णांची विशेष काळजी घेण्यात यावी. अशा सुचना देताना आरोग्य सुविधेतील हलगर्जीपणा खपवून घेणार नाहीत, असे आदेश राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी येथे दिले.
Dada Bhuse took Review meeting ahead of Ramadan
Dada Bhuse took Review meeting ahead of Ramadan

मालेगाव : कोरोना विषाणूशी लढा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, रुग्णालयातील स्वच्छतेवर लक्ष देण्यात यावे, रुग्णांची विशेष काळजी घेण्यात यावी. अशा सुचना देताना आरोग्य सुविधेतील हलगर्जीपणा खपवून घेणार नाहीत, असे आदेश राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी येथे दिले.

शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, "मालेगाव शहरात कोरोनाचे थैमान सुरु आहे. यामुळे नागरिकांवर भितीचे सावट पसरले आहे. अशा परिस्थितीमध्ये आरोग्य प्रशासनासह पोलिस प्रशासन जिवाचे रान करुन अहोरात्र झटत आहेत. त्यांच्याबद्दल सहानुभूती ठेवत त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे सहकार्य अपेक्षीत असताना त्यांच्यावर धावून जाणे, रुग्णालयात तोडफोड करणे ही अतिशय खेदाची बाब आहे. लॉकडाऊनमुळे प्रत्येक नागरिकाला बंदिस्त रहावे लागत असतांना त्याला ९७ टक्के नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. काही मुठभर लोकांकडून असे बेकायदेशीर प्रकार होत आहेत, ते बरोबर नाही. कुणी जाणून बुजून असे प्रकार करुन कायदा होतात घेत असेल, तर त्याची गय केली जाणार नाही.'' 
नागरिकांनी संयम बाळगावा व प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन करावे असे आवाहनही भुसे यांनी केले आहे.

रमजानसाठीच्या उपाययोजनांचाही घेतला आढावा

रमजान पर्वाच्या अनुषंगाने महानगरपालिका प्रशासनामार्फत केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेताना मंत्री श्री.भुसे म्हणाले, ''प्रतिबंधीत क्षेत्रातील व त्याबाहेरील प्रत्येक नागरिकांपर्यंत आवश्यक त्या सुविधा पोहचल्या पाहिजे. भाजीपाला, दुध व फळे यांचे नियोजन करतांना महानगरपालिकेमार्फत सुचविण्यात आलेल्या प्रभागातील दहा ठिकाणांपर्यंत वितरणाचे सुयोग्य नियोजन करण्यात यावे. प्रशासनाने देखील शासकीय चौकटीत न राहता मानवतावादी दृष्टीकोनातून नागरिकांना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध केल्यास नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी,'' 

माजी आमदार आसिफ शेख यांनी देखील त्यांच्या सहकार्यांच्या व स्वयंसेवकांच्या मदतीने प्रशासन व नागरिकांमध्ये समन्वय साधून अत्यावश्यक सेवा, सुविधा तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचविण्यास सहकार्य करावे असेही मंत्री श्री. भुसे म्हणाले.

यावेळी इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचे प्रमुख डॉ.पंकज आशिया, पोलिस अधिक्षक (ग्रामीण) आरती सिंग, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, अपर पोलिस अधिक्षक संदीप घुगे, माजी आमदार आसिफ शेख, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, आयुक्त किशोर बोर्डे, उपायुक्त नितीन कापडणीस, तहसिलदार शिवकुमार आवळकंठे, उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले, मंगेश चव्हाण यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com