Nashik news - Hire-Bhuse fight | Sarkarnama

दाभाडीमध्ये राज्यमंत्री दादा भुसेंना आव्हान? 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात दाभाडी गाव चर्चीत राहिले आहे. गेली पंधरा वर्षे तेथे शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे समर्थकांची सत्ता आहे. प्रस्थापितांविरोधात राजकारण करणारे शिवसेनेचे नेतेच आता प्रस्थापित झालेत. त्यामुळे पुन्हा एकदा इथे ग्रामपंचायत निवडणूकीत हिरे विरुध्द भुसे अशी लढत रंगली आहे. त्यात राज्यमंत्री भुसेंच्या राजकीय अस्तित्वाला आव्हान मिळाले आहे. 

मालेगाव : कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात दाभाडी गाव चर्चीत राहिले आहे. गेली पंधरा वर्षे तेथे शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे समर्थकांची सत्ता आहे. प्रस्थापितांविरोधात राजकारण करणारे शिवसेनेचे नेतेच आता प्रस्थापित झालेत. त्यामुळे पुन्हा एकदा इथे ग्रामपंचायत निवडणूकीत हिरे विरुध्द भुसे अशी लढत रंगली आहे. त्यात राज्यमंत्री भुसेंच्या राजकीय अस्तित्वाला आव्हान मिळाले आहे. 

मालेगाव बाह्य मतदारसंघात दाभाडी आणि सौंदाने या दोन मोठ्या गावांचा राजकीयदृष्ट्या मोठा प्रभाव आहे. गेली पंधरा वर्षे या ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समितीवर शिवसेनेचा कब्जा होता. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणूकीत कालचे प्रस्थापित व सध्या राजकीय विस्थापित असलेले अद्वय हिरे यांनी शिवसेनेचा हा गड सर केला. ग्रामपंचायत निवडणूकीत हिरे आणि भुसे दोघांनीही कंबर कसुन उमेदवारांच्या निवडीपासून काळजी घेतली आहे. भाजपचे अद्वय हिरे यांनी त्यासाठी जाणीवपूर्वक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. 

सरपंचपदासाठी चारुशीला अमोल निकम यांनी उमेदवारी दिली आहे. अद्वय हिरे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथ निकम यांनी निवडणुकीसाठी गावात तळ ठोकला आहे. त्यांच्या विरोधात राज्यमंत्री दादा भुसे गटाकडून शिवसेनेने वनमाला प्रमोद निकम उमेदवार आहेत. भुसे गटाचे यशवंत मानकर आणि शशिकांत निकम यांच्याकडे निवडणुकीची सूत्रे आहेत. तालुक्‍यातील मोठी व सुमारे वीस हजार लोकसंख्येचे गाव असल्याने त्याचा विधानसबेच्या निवडणूकच्या राजकारणात त्याला मोठा महत्त्व आहे. त्यामुळे राज्यमंत्री भुसे यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्याचा परिणाम आगामी निवडणुकीच्या राजकारणावर होणार आहे. दोन्ही गटांनी विजयासाठी कंबर कसली आहे. घरोघरी प्रचाराचा धुरळा उडाला असून त्यात गावाच्या विकासाची आश्‍वासने दिली जात असले तरी खरी प्रतिष्ठा राजकीय अस्तित्वाचीच आहे. 

तालुक्‍यातील सौंदाने गावाची लोकसंख्याही वीस हजारांच्या पुढे आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर ते मालेगाव तालुक्‍याचे प्रवेशद्वार आहे. येथेही दहा वर्षे दादा भुसे अर्थात शिवसेनेची सत्ता होती. जिल्हा परिषद गटात हिरे गटाचे मनिषा पवार विजयी झाल्या होत्या. गावात शिवसेनेच्या उमेदवाराला आघाडी होती. भाजपचे अद्वय हिरे गटाचे मिलिंद पवार यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने सामाजिक कार्यकर्ते चेतन पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे प्रभागांतील उमेदवारांपेक्षा सरपंचपदातच चुरस आहे. त्यात उमेदवार दुय्यम तर राज्यमंत्री दादा भुसे आणि भाजपचे नेते अद्वय हिरे यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख