गजानन महाराज संस्थानने तयार केले 670 बेडचे कोरोंटाईन युनिट

मंदिर बंद असतांनाही श्री गजानन महाराज संस्थानचे सेवाकार्य सुरूच आहे. 'कोरोना' विरोधात लढा देतांना संस्थानने कम्युनिटी किचन अंतर्गत गरजूंना भोजन वितरण सुरु केले आहे. येथील यात्रा निवास संकुलाचे रुपांतर आता 670 बेडचे कोरोंटाईन युनिटमध्ये केले आहे
Gajanan Maharaj Temple Created Seven Fifty Beds Qurantine Unit
Gajanan Maharaj Temple Created Seven Fifty Beds Qurantine Unit

त्रंबकेश्वर : मंदिर बंद असतांनाही श्री गजानन महाराज संस्थानचे सेवाकार्य सुरूच आहे. 'कोरोना' विरोधात लढा देतांना संस्थानने कम्युनिटी किचन अंतर्गत गरजूंना भोजन वितरण सुरु केले आहे. येथील यात्रा निवास संकुलाचे रुपांतर आता 670 बेडचे कोरोंटाईन युनिटमध्ये केले आहे. या निमित्ताने मानव व वंचितांच्या सेवेसाठी जगभर ख्याती असलेले हे संस्थान त्यांच्या कामाच्या माध्यमातून सेवाभाव जपला जपत आहे. शेगांवसह संस्थानच्या त्र्यंबकेश्वर, पंढरपूर, ओंकारेश्वर शाखेतही असेच सेवाकार्य सुरु आहे.

जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून यास प्रतिबंध म्हणून शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. देशभरात सध्या लॉकडाऊन व संचारबंदी आहे. 'कोविड 19' विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील सर्व धार्मिक स्थळांसह गजानन महाराजांचे मंदिर देखील बंद ठेवले आहे. 

भोजन वाटपाचे काम

नाशिकला कोरोना रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे सदैव सामाजिक व सेवाभावी कार्यात अग्रेसर असणाऱ्या या संस्थाननेही प्रशासनाच्या मदतीसाठी सेवाभावनेतून काम सूरू केले आहे. यामध्ये रोज 500 भोजन पॅकेट्‌सचे वितरण डोबरवाडी परिसर, सावळवारी, चिकाटी पाडा, कोटंबी, फनसाडा, आधारतिर्थ आश्रम, खरवंड, देवडोंगर, बोरपाडा, खरशेत सावरपाडा भागात केले जात आहे. शेगांवसह श्री संस्थानच्या पंढरपूर, ओंकारेश्वर शाखेच्या माध्यमातून परप्रांतिय, बेघर, निराधार आणि गोरगरिब व गरजूंना कम्युनिटी किचन अंतर्गत दररोज एकूण 6,615 भोजन पाकिटचे वितरण सुरक्षित अंतर राखून केले जात आहे. 

सत्तर बेडचे क्वारंटाईन युनिट

सत्तर बेडचे क्वारंटाईन युनिट तयार केले आहे. पोलीस उपविभागिय अधिकारी भिमाशंकर ढोले, तहसिलदार दिपक गिरासे, जिल्हा उपरुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ भागवत लोंढे यांनी त्याची पाहणी केली. दिवसेंदिवस वाढत असलेल्या रूग्णसंख्येमुळे श्री गजानन महाराज संस्थानच्या शेगांव, त्र्यंबकेश्वर येथील शाखेमध्ये 70 बेडचे सुसज्ज कोरोंटाईन युनिट उभारले आहे. त्र्यंबकेश्वर येथील डॉक्‍टर्स, नर्स व इत्यादी कर्मचारीवृंद यांच्या करीता निवास व्यवस्थेसह चहा, नास्ता, भोजन इत्यादीची सुविधा पुरविण्यात येत आहे. 

तसेच शेगांव येथील विसावा भक्तनिवास संकुल येथे 500 बेडचे तर श्री क्षेत्र पंढरपूर शाखेमध्ये 100 बेडचे सुसज्ज कोरोंटाईन युनिट उभारले आहे. तसेच शाखा ओंकारेश्वर येथे 400 गरजूंना भोजन पुरविण्यात येते. 'कोरोना'चा संसर्ग नागरिकांना होवू नये याकरिता संस्थानकडून जनजागृती करण्यात येत आहे. शेगांव येथे सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रूग्णालय येथील डॉक्‍टर्स, नर्स व इत्यादी कर्मचारीवृंद यांच्याकरीता विसावा संकुल येथे निवास व्यवस्थेसह चहा, नास्ता, भोजन इत्यादीची सुविधा पुरविण्यात येत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com