गिरीश महाजन यांच्यापुढे शेतकरी आक्रमक; जिल्हाधिकारी आले मदतीला

अतिवृष्टीमुळे झालेल्या हानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आज द्राक्ष बागाईतदार संघाच्या कार्यालयात गेले. तेव्हा द्राक्ष उत्पादकांनी विविध अडचणी मांडल्या. यावेळी एका शेतकऱ्याने गतवेळी "आम्हाला नुकसान भरपाईचे अनुदान आले. यादी लागली. मात्र अद्याप ते पैसे मिळालेले नाहीत. नेमके हे पैसे गेले कुठे?'', असा सवाल उपस्थित केला.
Grape Farmers Aggressive Before Girish Mahajan
Grape Farmers Aggressive Before Girish Mahajan

नाशिक : अतिवृष्टीमुळे झालेल्या हानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आज द्राक्ष बागाईतदार संघाच्या कार्यालयात गेले. तेव्हा द्राक्ष उत्पादकांनी विविध अडचणी मांडल्या. यावेळी एका शेतकऱ्याने गतवेळी "आम्हाला नुकसान भरपाईचे अनुदान आले. यादी लागली. मात्र अद्याप ते पैसे मिळालेले नाहीत. नेमके हे पैसे गेले कुठे?'', असा सवाल उपस्थित केला.

याचे उत्तर महाजनांनीच द्यावे हा शेतकऱ्याचा हट्ट होता. त्यामुळे वातावरणाचा नुरच बदलला. मात्र, जिल्हाधिकारी सुरज मांढरे पुढे आले त्यांनी "हा निधी अद्याप प्राप्त झालेला नाही,'' अशी माहिती दिल्यावर बैठक पुढे सुरु झाली. 

यावेळी असंख्य शेतकऱ्यांनी समस्या मांडल्या. यावेळी एक शेतकरी म्हणाले ''मागच्या खेपेला सरकारेन अनुदानाची घोषणा केली. यादी आली. बॅंकेने यादी फलकावर लागली. मात्र अद्याप ते पैसे मिळालेले नाही. हे पैसे गेले कुठे? याचे उत्तर पालकमंत्री म्हणून आपणच द्यावी असा माझा आग्रह आहे.'' पालकमंत्र्यांनी आपण प्रश्‍नात लक्ष घालतो असे वारंवार सांगितले. मात्र त्याचे समाधान झाले नाही. बैठकीचा नुर बदलु लागल्याचे पाहताच जिल्हाधिकारी सुरज मांढरे पुढे आले त्यांनी हे अनुदान अप्राप्त आहे. अशी माहिती दिली. त्यानंतर गिरीश महाजन यांनी प्रांजळपणे हा विषय मला माहिती नव्हता. अन्यथा केव्हाच सुटला असता. आता निश्‍चिंत रहा. येत्या दोन दिवसात त्यावर कार्यवाही होईल. असे सांगीतल्यावर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी आमदार दिलीप बनकर, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, खासदार डॉ. भारती पवार, आमदार राहूल आहेर, आमदार राहुल ढिकले, माजी आमदार अनिल कदम, राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्‍वरी आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com