शिवसेनेत जाताच कॉंग्रेस नेत्यांचे आमदार निर्मला गावितांवर भ्रष्टाचाराचे आरोप 

आमदार निर्मला गावित यांनी गेल्या आठवड्यात कॉंग्रेसचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला. कॉंग्रेसमध्ये असतांना नेते त्यांच्या कामावर स्तुतीचा वर्षाव करीत होते. मात्र, पक्ष सोडताच आक्रमक झालेल्या या नेत्यांनी त्यांच्यावर सिंचन योजनेच्या नावाखाली कोट्यावधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. त्यांनी मतदारसंघातून निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान देण्यात आले आहे.
शिवसेनेत जाताच कॉंग्रेस नेत्यांचे आमदार निर्मला गावितांवर भ्रष्टाचाराचे आरोप 

इगतपुरी  : आमदार निर्मला गावित यांनी गेल्या आठवड्यात कॉंग्रेसचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला. कॉंग्रेसमध्ये असतांना नेते त्यांच्या कामावर स्तुतीचा वर्षाव करीत होते. मात्र, पक्ष सोडताच आक्रमक झालेल्या या नेत्यांनी त्यांच्यावर सिंचन योजनेच्या नावाखाली कोट्यावधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. त्यांनी मतदारसंघातून निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान देण्यात आले आहे. 

कॉंग्रेसच्या इगतपुरी- त्र्यंबकेश्वर पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक झाली. जिल्हा अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांसह जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपत सकाळे यांनी या बैठकीत मार्गदर्शन केले. यावेळी श्री. सकाळे यांनी आमदार निर्मला गावित यांच्या कुटुंबावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले. आज कॉंग्रेस पक्ष संकटातून जात असतांना स्वतःच्या फायदयासाठी गावित यांनी स्व. इंदिराजीच्या विचाराचा विश्वास घात केला. त्यांनी पदाचा गैरवापर करुन भ्रष्टचार केला. त्याचे सर्व पुरावे आपण गोळा केले आहेत. दूध संघ, आदिवासी उपसा सिंचन संस्था यासाठी कोऱ्या धनादेशावर साह्य घेत कोट्यावधी रुपयांची उलाढाल केल्याचा आरोप त्यांनी केला,

आदिवासींना उपसा सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यावर सर्वत्र उन्नतीचे कवाडे खुले होईल असे सांगत स्वतःच्या फायद्यासाठी जमिनी घेऊन लूट केल्याचा आरोपही त्यांनी केला. 'ज्या माणसाने त्यांना तालुक्‍यात आणत निवडून दिले त्यांची दांडी गुल केली, हा भ्रष्टाचार शंभर कोटींचा नाही तर त्याहूनही अधिक होईल. यात आमदार निर्मला गवितांचा दोष नाही. त्यांचे पती कार्यकारी अभियंता रमेश गावित यांनीच त्यांना झोपेत ठेवून फसवले आहे. मराठा अधिकाऱ्यांना जातीचा धाक दाखवून नको तेथे साह्य करण्यास भाग पाडले, कार्यकर्त्यांच्या नावावर शेकडो बॅंक प्रकरणे केली,' असे गंभीर आरोप करत याबाबत पुरावे सादर करण्यात येणार असून त्यांचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी गवितांना या बैठकीत दिला. 

यावेळी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष डॉ. शेवाळे, पक्ष निरीक्षक नंदू कडलग, रमेश कहांडोळे, शांताराम मुळाने, हिरामण खोसकर, अँड संदीप गुळवे, वसंत डामसे, जनार्धन माळी, भास्कर गुंजाळ, मधू कोकणे, यशवंत महाले, माजी सभापती आनंदराव सहाणे, बाळासाहेब वालझाडे आदी नेते उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com